PHOTOS

मसाले, मीठ, साखर ओलसर लागतेय? करून पाहा हे सोपे घरगुती उपाय...

m Moisture: अगदी सुकी मच्छी साठवण्यापासून, कडधान्य भरेपर्यंत सर्व गोष्टींचा घाट घरातलं महिला मंडळ घातलाना दिसतं. काही कारणानं याचा विसर...

Advertisement
1/7
Kitchen Tips
Kitchen Tips

Kitchen Tips : तुम्हीही अशाच अडचणीनं त्रस्त आहात का? म्हणजे मसाले किंवा तत्सम पदार्थांमध्ये येणाऱ्या दमटपणामुळं तुम्हीही चिंतेत आहात का? 

 

2/7
घरगुती उपाय
घरगुती उपाय

आता चिंता करायची गरज नाही. कारण, यावरचे काही सोपे उपाय आपण इथं पाहणार आहोत. 

3/7
मसाले
मसाले

लाल तिखट अर्थात वर्षभर चालेल असा मसाला चांगला ठेवण्यासाठी, त्याला दमटपणा धरु न देण्यासासाठी त्यामध्ये अख्ख्या लवंगी मिरच्या आणि लवंग मिसळा. मसाल्यामध्ये तुम्ही हिंगाचा खडाही ठेवू शकता.  

4/7
हळद
हळद

रोजच्या जेवणाध्ये वापरली जाणारी हळद चांगली रहावी यासाठी ती लहान लहान डब्यांमध्ये ठेवत त्यामध्ये तमालपत्र ठेवावं. अशानं हळदीमध्ये बाष्प धरत नाही. 

 

5/7
साखर
साखर

पावसाळी दिवसांमध्ये सहसा साखरही हाताला ओलसर भासते. हे टाळण्यासाठी साखरेच्या डब्यात एका पुरचुंडीमध्ये तांदूळ बांधून ठेवा. अशानं तांदुळाची पुरचुंडी पाष्प खेचून घेते. 

 

6/7
मीठ
मीठ

मीठामध्ये ओलसरपणा येऊ नये यासाठी नेमकं काय करावं याचा विचार तुम्ही करत असाल तर लक्षात घ्या की मीठाच्या डब्यात कायम एक दालचिनीचा तुकडा ठेवा. 

7/7
धान्य, कडधान्य
धान्य, कडधान्य

राहता राहिला प्रश्न कडधान्यांचा तर, या गोष्टींमध्ये बाष्प येऊ नये यासाठी तुम्ही तमालत्र, दालचिनी किंवा लवंग मिसळा. लवंगी मिरचीसुद्धा इथं तुमची मदत करू शकेल.  (सर्व छायाचित्र- फ्रिपीक)

 





Read More