PHOTOS

50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?

ी काळ रात्र आजही अनुभवणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारा आणते. 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्री उशिरा अचानक देशात आण...

Advertisement
1/11

या आणीबाणीबदद्ल अनेक कारणं होती. पण समाजवादी नेते राजनारायण यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी निवडणूक रद्द केली होती. 

2/11

 25 जून 1975 ची ती काळ रात्र आणि ते रात्री 12 वाजेपासून त्या 4 तासात अनेक घडामोडी घडल्यात. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध घटना मानली जाते. निवडणुका रद्द करण्यामागे आणि पंतप्रधानांना अभूतपूर्व अधिकार देणारा आदेश लागू करण्यामागे त्यांनी 'अंतर्गत गडबड' असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. इंदिरा गांधी सरकारने असा युक्तिवाद केला होता की राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे ज्यासाठी अशा कठोर निणर्याची गरज पडली होती. त्यावेळी, पाकिस्तानबरोबरचे युद्ध नुकतंच संपले होते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झालं होतं. यामुळे देशाचे मोठं नुकसान झाल्याचं सरकारची म्हणं होतं. 

3/11

त्या रात्री चार तासात पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधीसोबत होते. ते इंदिरा गांधींचे विश्वासू होते. त्यांनी या आणीबाणीबद्दल रणनिती ठरवली होती असं सांगितलं जातं. देशात आणीबाणी कशी लागू केली जाईल, कोणत्या लोकांना अटक होईल, प्रेसवर सेन्सॉरशिप कशी लादली जाईल या सगळ्या गोष्टी त्यांनी आखल्या होत्या. 

4/11

प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांना आणीबाणी काळात जेल झाली होती. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, आणीबाणीची इनसाइड स्टोरी यात त्यांनी त्या आणीबाणी काळातील घटना सांगितलं होतं. त्यांनी या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की, 20 जूनला इंदिरा गांधी यांची एक रॅली होती. ज्यामध्ये त्या बोलल्या होत्या की, त्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्याही पदावर असल्या तरी जनतेची सेवा करत राहणार आहेत. 

5/11

जनतेची सेवा करणे ही त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे. खरं तर त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक सभेत कुटुंबाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यावेळी इंदिरा गांधीसोबत स्टेजवर संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. बड्या शक्ती देशातील सत्ता आणि मला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्या हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठं जाळं पसरवलंय. 

6/11

इंदिरा गांधी यांचे विश्वासू आणि लहानपणीचे मित्र सिद्धार्थ शंकर रे यांना कलकत्तामध्ये बोलवण्यात आलं होतं. 24 जूनला सिद्धार्थ शंकर रे यांनी इंदिरा गांधींना आणीबाणी घोषत करण्याची सल्ला दिली. मग तत्काळ त्यानंतर संसदेच्या ग्रंथालयातून राज्यघटनेची प्रत आणण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानातून कोणाला तरी पाठवलं. आणीबाणी लागू करण्यासाठी पंतप्रधान सचिवालयाने आधीच एक नोट तयार ठेवली होती. आणीबाणीच्या अधिकारांतर्गत केंद्र कोणत्याही राज्याला सूचना करु शकतं. आणीबाणी लागू करताना गोपनीयतेची विशेष काळजी घेतली गेली होती. 

7/11

रे यांनी इंदिरा गांधीच्या सचिव पीएन धर यांना आणीबाणीची कल्पना दिली. धर यांनी टायपिस्टकडून आणीबाणीचा घोषणेचा प्रस्ताव लिहून घेतला. त्यानंतर आर के धवन यांनी सर्व कागदपत्र राष्ट्रपती भवनात पोहोचवले. आणीबाणी लागू झाल्यानंतर तीन तासांनी इंदिरा गांधी झोपायला गेल्यात. पण दुसरीकडे देशभरात अटकसत्र सुरु झालं. जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांनी पोलिसांनी अटक केली. 

8/11

आणीबाणीला कायदेशीर करण्यासाठी तत्कालीन कायदामंत्री एच.आर.गोखले यांनी मदत केली. आणीबाणीची रणनिती इंदिरा गांधींसह आरके धवन, बन्सीलाल, ओम मेहता, किशन चंद आणि सिद्धार्थ शंकर रे यांना माहिती होती. विशेष म्हणजे इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधींनीही याची कल्पना नंतर देण्यात आली होती. 

9/11

तर लेडर्स, पॉलिटिशियन्स, सिटिझन्स या पुस्तकाचे लेखक रशीद किडवाई सांगतात की, आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी मंत्री, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांशी थेट संपर्क ठेवला नव्हता. या लोकांना कुठल्याही सूचना करायच्या असल्या तर आरके धवन हे त्यांना सांगायचे. मागे हेतू होता तर काही गडबड झाली तर याची जबाबदारी धवन यांच्या अंगावर येईल. 

10/11

 विरोधकांना आणीबाणीची काही कल्पना नव्हती. ते 25 जूनला होणाऱ्या जि.प.च्या मेळाव्याच्या तयारीत लागले होते. तर दुसरीकडे पंतप्रधानांवर शाब्दिक हल्लाबोल त्यांचा सुरुच होता. इंदिरा गांधी हुकूमशहा झाल्या असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. या मागणीसाठी जेपींनी 29 जूनला आंदोलनही करणार होते. 

11/11

तर कुलदीप यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, आणीबाणीच्या चार तास आधी सिद्धार्थ शंकर रे हे राष्ट्रपती भवनात गेले होते. त्यांनी राष्ट्रपतींना आणीबाणीचा अर्थ समजवला. ही भेट जवळपास 45 मिनिटांची होती. राष्ट्रपतींनी याला विरोध दर्शविला नाही. तर देशाच्या सर्वौच्च पदावर नियुक्त केल्याबद्दल इंदिरा गांधी यांचे ते ऋणी होते. राष्ट्रपतींनी 11:45 वाजता आणीबाणी लागू करा या प्रस्तावावर सही केली. 





Read More