PHOTOS

कंबर, मांड्यांवरील चरबी झटकन कमी करतील 'ही' 5 योगासनं, नियमित केल्यास दिसेल परिणाम

ी आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा त्यांच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्या...

Advertisement
1/7

या जाहिरातीना न भूलता जर तुम्ही नियमित योगा केल्यास त्याचा परिणाम जीवनावर सकारात्मक होईल आणि वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरेल. 

2/7

लठ्ठपणा हा अनेक आजारापणाला निमंत्रण आहे. त्यामुळे वजन नियंत्रात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही कंबर आणि मांडीवरील चरबी घालवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हे योगासन तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. 

3/7
उत्कटासन
उत्कटासन

उत्कटासनाचा सराव कंबर आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. उत्कटासन शरीराच्या खालच्या भागावर जोर देते, ज्यामुळे कंबर आणि मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते. उत्कटासनाचा सराव करण्यासाठी प्रथम सरळ उभे राहा आणि पाय थोडे पसरवा. या स्थितीत, तुमचे दोन्ही हात समोर सरळ करा आणि हळू हळू तुमचे गुडघे वाकवा आणि तुमचे शरीर खाली वाकवा, जसे की तुम्ही खुर्चीवर बसला आहात. ही स्थिती काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या. या आसनाचा सराव करताना शरीर खुर्चीच्या आकारात दिसेल यावर भर द्या. याचा नियमित सराव केल्याने अनेक फायदे होतात.

4/7
भुजंगासन
भुजंगासन

 भुजंगासनामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो आणि फुफ्फुस मजबूत होतात. भुजंगासनाचा सराव करण्यासाठी आधी पोटावर झोपा आणि हात खांद्याच्या खाली ठेवा. आता हळू हळू हातांच्या मदतीने शरीराचा वरचा भाग उचला आणि डोके मागे टेकवताना छाती वर करा. ही स्थिती काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या. सुरुवातीला या आसनाचा दररोज 5-10 वेळा सराव करा.

5/7
वीरभद्रासन
वीरभद्रासन

विरभद्रासनामुळे  पाय, नितंब आणि खांदे यांचे स्नायू मजबूत देखील मजबूत होतात. यासोबतच हे आसन तुमचं संतुलन आणि एकाग्रता सुधारण्यास फायदेशीर ठरतं. विरभद्रासनाचा सराव करण्यासाठी, सरळ उभे राहा आणि तुमचे पाय वेगळे ठेवा, उजवा पाय 90 अंश फिरवा आणि डावा पाय किंचित आतील बाजूस फिरवा. यासोबतच तुमचं हात खांद्याच्या उंचीपर्यंत वाढवा, तळवे खाली तोंड करून ठेवा आणि उजवा गुडघा वाकवा आणि डावा पाय सरळ ठेवा. या आसनाचा 5-10 वेळा सराव करा.

 

6/7
सेतुबंधासन - ब्रिज पोझ
सेतुबंधासन - ब्रिज पोझ

सेतुबंधासन कंबर आणि मांड्यांची चरबी कमी करते शिवाय पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवते. यासोबतच सेतुबंधासनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. सेतुबंधासनाचा सराव करण्यासाठी, प्रथम आपल्या पाठीवर झोपा आणि आपले गुडघे वाकवा. आता तुमचे पाय जमिनीवर ठेवा आणि तुमची टाच नितंबांच्या जवळ आणा. या दरम्यान, आपले हात शरीराजवळ ठेवा आणि हळू हळू आपले नितंब वर करा. ही स्थिती काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या.

7/7
नौकासन
नौकासन

नौकासनाचा रोजचा सराव कंबर आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेच शिवाय नौकासन पोटाचे, पाठीचे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. याचा सराव करण्यासाठी, तुमच्या पाठीवर झोपा आणि हळूहळू तुमचे पाय आणि शरीराचा वरचा भाग वर करा, जेणेकरून तुमचे शरीर बोटीच्या आकारात दिसेल. या दरम्यान, आपले हात पायांच्या दिशेने सरळ ठेवा. नौकासन स्थितीत काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Read More