PHOTOS

ग्राहकांना दिलासा! अखेर लसूण स्वस्त; आता किती रुपयांना मिळतोय?

/strong>अखेर लसणाचे दर थेट निम्म्यानं कमी झालेत. उच्चांकी दर मिळाळेल्या लसणाच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरू झा...

Advertisement
1/7

उच्चांकी दर मिळाल्यामुळे अखेर लसणाच्या दरात निम्माने घट झाली आहे. नवीन लसणाचा हंगाम सुरु झाला आहे. मध्यप्रदेशातून लसणाती आवक वाढली आहे. हेच लसूण पंधरा दिवसांपूर्वी एक किलो लसणाचे दर 400 रुपये किलोपर्यंत होते. 

2/7

किरकोळ बाजारात एक किलो लसणाला 200 ते 250 रुपयांना मिळत आहेत. मात्र नवीन हंगाम सुरु झाल्यानंतर बाजारात दररोज 20 ते 30 टन लसणाची आवक होत आहे. 

3/7

महाराष्ट्रात गावरान लसणाची लागवड कमी झाल्यामुळे परराज्यातील लसणाला मागणी वाढली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

4/7

लसणाचा नवा हंगाम सुरु झाला असून मध्य प्रदेशात लसणाची आवक वाढली आहे. थंडी ओसरल्यानंतर परराज्यातील लसणाचा हंगाम सुरु होतो. 

5/7

येत्या तीन ते चार महिन्यांत लसणाची मोठी आवक होईल. त्यामुळे लसणाच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. 

6/7

आता लसणाचे दर घाऊक बाजारात दहा किलोचा दर – रु 1000 ते 1600.

7/7

लसणाचा किरकोळ बाजारात एक किलोचा दर – रु 200 ते रु. 250

 





Read More