PHOTOS

जेव्हा सुलोचना दीदींनी अमिताभ यांना लिहले होते पत्र, वाचून भावूक झाले होतो बिग बी

ात्विक भाव... आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना...

Advertisement
1/8
जेव्हा सुलोचना दीदींनी अमिताभ यांना लिहले होते पत्र, वाचून भावूक झाले होतो बिग बी
जेव्हा सुलोचना दीदींनी अमिताभ यांना लिहले होते पत्र, वाचून भावूक झाले होतो बिग बी

डोळ्यात अपार माया आणि चेहऱ्यावर सात्विक भाव... आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदी यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना दीदी यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

2/8
बेळगावातील जन्म
बेळगावातील जन्म

सुलोचना लाटकर यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी बेळगावातील खडकलरत गावात झाला. १९४६ साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 

 

3/8
मराठी अजरामर सिनेमे
मराठी अजरामर सिनेमे

सुलोचना दीदी यांचे बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ, सांगत्ये ऐका, मोलकरीण, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं हे सिनेमे अजरामर ठरले

4/8
अन् त्या पडद्यावरच्या आई झाल्या
अन् त्या पडद्यावरच्या आई झाल्या

मराठी चित्रपटसृष्टीनंतर सुलोचना दीदी यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. दिल देके देखो या १९५९ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली

5/8
आईची भूमिका
आईची भूमिका

सुलोचना दीदी यांनी दिलीप कुमार, धर्मेंद्र आणि अमिताभ या दिग्गज कलाकारांच्या आईची भूमिका साकारली होती. रेशमा और शेरा, मजबूर आणि मुकद्दर हे सिनेमे त्यांचे गाजले. 

6/8
दीदींचा वाढदिवस केला होता साजरा
दीदींचा वाढदिवस केला होता साजरा

अमिताभ बच्चन यांनी अनेकदा त्यांच्या ब्लॉगमध्येही सुलोचना दीदी यांचा उल्लेख केला होता. काही वर्षांपूर्वी दीदींच्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले होते. 

7/8
बिग बींना लिहलं होतं पत्र
बिग बींना लिहलं होतं पत्र

अमिताभ बच्चन यांच्या ७५व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुलोचना दीदी यांनी त्यांना पत्र लिहलं होतं. बिग बींनी सोशल मीडियावर हे पत्र शेअर करत त्यांचे आभारही मानले होते. 

8/8
महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

सुलोचना दीदींनी तब्बल २५० हिंदी आणि ५० मराठी चित्रपटात काम केले आहे. सुलोचना यांना १९९९ साली पद्मश्री, २००९ साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 





Read More