PHOTOS

PHOTO: स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या

्षात स्टार्टअपला सुरुवात करताना अनेकांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क...

Advertisement
1/13
स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या
स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या

Startup Fear:दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा काहीतरी स्टार्टअप/व्यवसाय करावा असे अनेकांना वाटत असते. यासाठी काहीजण यूट्यूबवर व्हिडीओ बघून प्रेरितदेखील होतात. पण प्रत्यक्षात स्टार्टअपला सुरुवात करताना त्यांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. कोणत्या भीती आहेत? ती भीती कशी पळवून लावायची याबद्दल जाणून घेऊया. 

2/13
लोक काय म्हणतील?
 लोक काय म्हणतील?

कोणतीही गोष्ट सुरु केली तर सर्वात पहिला येणारा प्रश्न म्हणजे, लोक काय म्हणतील? व्यवसाय सुरु करताना हा पहिला प्रश्न मनात येतोच. कोणतीही नवीन आयडीया प्रत्यक्षात येताना ही शंका तुमच्या मनात येईल. 

3/13
मन मजबूत बनवा.
 मन मजबूत बनवा.

 

पण त्यावेळी मन मजबूत बनवा.जे लोक तुमच्यावर हसतायत किंवा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तर तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा. तुम्ही करताय ते लोकांच्या पसंतीस येतंय, तुम्हाला फायदा होतोय, तुम्हाला ते आवडतंय मग लोकं काय म्हणतात याचा विचार अजिबात करु नका. 

4/13
हारण्याची भीती
 हारण्याची भीती

दुसरी मनात भीती येते की मी जर यात अयशस्वी झालो तर? या प्रश्नाचे उत्तर न शोधताच काहीजण बिझनेसची आयडीया मनातच मारुन टाकतात. व्यवसाय नाही चालला तर वेळ आणि पैसा फुकट जाईल. पुन्हा नोकरी मिळणं कठीण होऊन जाईल.नोकरीत थोडा का होईना पगार तरी मिळत राहील, असे वाटत राहते. 

5/13
मार्केटची प्रतिक्रिया
मार्केटची प्रतिक्रिया

यातून बाहेर पडणं अजिबात अशक्य नाही. व्यवसाय सुरु करण्याआधी मार्केट रिसर्च करा. त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसबद्दल मार्केटची प्रतिक्रिया कळेल.यावेळी तुम्हाला तो व्यवसाय चालेल की नाही याची आयडीया येईल. त्यानुसार तुम्ही कल्पनेत बदल करु शकता. 

6/13
स्पर्धेची भीती
स्पर्धेची भीती

बाजारात आधीच इतके व्यवसाय आहेत त्यात माझा व्यवसाय कसा चालेल? ही भीती मनात हमखास येते. त्यामुळे लोकं काही नवीन करायचा विचारच करत नाहीत. 

7/13
आयडीया इतकी वेगळी
 आयडीया इतकी वेगळी

यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला यूनिक आयडीया घेऊन व्यवसायात उतरावं लागेल.तुमची आयडीया इतकी वेगळी असावी की त्याचे पेटंट बनू शकेल. मग तुमची आयडीया कोणी चोरु शकत नाही. याआधी मार्केट रिसर्च नक्की करा. ज्याने तुम्ही अयशस्वी होण्याचा धोका थोडा कमी होईल. 

8/13
रिसोर्स नाहीत मग काय करायचं
 रिसोर्स नाहीत मग काय करायचं

व्यवसाय सुरु करायचाय पण माझ्याकडे पुरेसं भांडवलं नाहीय. माझ्या इतक्या ओळखी नाहीयत. मग माझा व्यवसाय यशस्वी कसा होईल? अशी भीती मनात येते. 

9/13
बिझनेस आयडीयावर जास्त भर
 बिझनेस आयडीयावर जास्त भर

व्यवसाय सुरु करताना भांडवल, कॉन्टॅक्ट किती आहे याचा विचार कमी करा आणि बिझनेस आयडीयावर जास्त भर द्या. तुमची आयडीया वाजणारी असेल तर मग ग्राहकांची रांग लागेल. लोकं स्वत:हून तुमच्याकडे येतील. 

10/13
लोकांनी नाकारण्याची भीती
 लोकांनी नाकारण्याची भीती

मार्केटमध्ये आलेले अनेक बिझनेस नाकारले जातात, असे आपल्याला वाटत असते. व्यवसायात केवळ नुकसानच होते.अशी भीती आपल्या मनात बसलेली असते. 

11/13
भीतीला सामोरे जाणं गरजेचं
भीतीला सामोरे जाणं गरजेचं

भीतीला सामोरे जाणं गरजेचं आहे. तुमच्याकडे वेगळी संकल्पना असेल आणि त्यासोबत मार्केट रिसर्चदेखील असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. लोकांकडून निगेटीव्ह फिडबॅक मिळाला तर त्यावर काम करा. त्यानुसार बदल करा. 

12/13
पॉलिसी बदलण्याची भीती
 पॉलिसी बदलण्याची भीती

अनेक व्यवसाय सरकारच्या पॉलिसीवर अवलंबून असतात. सरकारने पॉलिसी बदलली तर आपण तोट्यात जाऊ अशी भीती व्यवसाय सुरु करण्याआधी मनात येते. 

13/13
तज्ञांशी चर्चा
 तज्ञांशी चर्चा

तुम्ही ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करणार आहात त्यातील तज्ञांशी चर्चा करा. सरकारच्या प्रतिनिधींशी बोला. गरज पडल्यास व्यवसायात थोडेफार बदल करा. पूर्ण व्यवसायच बदलणार असेल तर दुसऱ्या सेक्टरमध्ये प्रवेश करा. जिथे जुन्या व्यवसायातील भांडवल आणि रिसोर्सेस तुम्हाला वापरता येतील. 





Read More