PHOTOS

अवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ

े? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी स...

Advertisement
1/7
खगोलीय घटना
खगोलीय घटना

यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटनांमध्ये काही ग्रह पृथ्वीजळून जाणार आहेत. तर काही दिवशी उल्कावर्षाव आणि धूमकेतूही पाहता येणार आहेत. 

2/7
गुरु पृथ्वीजवळ येत असून...
गुरु पृथ्वीजवळ येत असून...

3 नोव्हेंबरला गुरु पृथ्वीजवळ येत असून, संपूर्ण महिनाभर तो पूर्व दिशेला साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. तर, 9 नोव्हेंबरला पहाटे शुक्र आणि चंद्राची युती पाहायला मिळेल. 

3/7
धूमकेतू येणार
धूमकेतू येणार

10 नोव्हेंबरला पृथ्वीजवळ सी/ 2023 एच 2 हा धूमकेतू येणार असून, तो दुर्बिणीतून पाहता येणार आहे. तर, 13 नोव्हेंबरला युरेनस ग्रह पृथ्वीजवळ येणार आहे. साध्या डोळ्यांनी तो पाहता येईल. 

4/7
चंद्र आणि बुधासह मंगळ ग्रहाची युती
चंद्र आणि बुधासह मंगळ ग्रहाची युती

14 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्र आणि बुधासह मंगळ ग्रहाची युती दिसेल. त्यामुळं हे ग्रह तुम्ही पाहू शकणार आहात. 

 

5/7
उल्कावर्षाव
उल्कावर्षाव

17 आणि 18 नोव्हेंबरला पूर्वेला रात्री लिओनीड उल्कावर्षाव पाहायला मिळेल. इथं ताशी 20 उल्का दिसण्याची शक्यता आहे. 

 

6/7
चंद्रासोबत शनिची युती
चंद्रासोबत शनिची युती

20 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्रासोबत शनिची युती पाहायला मिळेल. तर, 25 नोव्हेंबरला सायंकाळी चंद्र आणि गुरु ग्रहाची युती दिसू शकते. 

7/7
कार्तिक पौर्णिमा
 कार्तिक पौर्णिमा

27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असल्यामुळं चंद्र आणखी तेजस्वी दिसेल. 28 नोव्हेंबरला पहाटे शुक्र ग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं तो आणखी तेजस्वी दिसणार आहे.