PHOTOS

मराठी चित्रपटांच्या प्रेमात साऊथ सिनेमा, रिमेकची संपूर्ण यादीच पाहा

ांतरीत करण्याचा फंडा बॉलिवूडने आजमावला. त्यातील अनेक चित्रपट यशस्वी झाले. तर काहींवर टीका करण्यात आल्या. आता हे स...

Advertisement
1/5
मजालीचा मराठी रिमेक वेड:
मजालीचा मराठी रिमेक वेड:

मजाली हा दाक्षिणात्य चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे बजेट 20 करोड आणि बॉक्सआफिस कलेक्शन 70 करोड होते. ज्याला खुप प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटाचा मराठी रिमेक वेड चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आला. वेडचे बजेट 10 करोड तर कलेक्शन 20 करोड होते. मजाली या चित्रपटात नागा चैतन्य, समंथा रुथ प्रभू तर वेड या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा प्रमुख भुमिकेत आहेत.

 

2/5
क्लासमेटस् चित्रपटाची पुनर्निर्मित:
क्लासमेटस् चित्रपटाची पुनर्निर्मित:

क्लासमेटस् नावाच्या मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेकन 2015 साली करण्यात आला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह इतर कलाकार यात वर्गमित्र दाखवले होते. मल्याळम क्लासमेटस् चित्रपटाचे बजेट 3 करोड आणि कलेक्शन 25 करोड होते. तर मराठी मधील क्लासमेटस् चे बजेट 5 करोड आणि कलेक्शन 20 करोड होते. 

3/5
टाईमपासचा आंध्र पोरी नावाने रिमेक:
टाईमपासचा आंध्र पोरी नावाने रिमेक:

दगडू आणि प्राजक्ता यांच्या प्रेमकथेने फक्त मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर दक्षिणेकडील प्रेक्षकांनाही आकर्षित केलं. टाईमपासचा आंध्र पोरी हा तेलगू रिमेक करण्यात आला आहे. रवी जाधव यांच्या टाइमपास मध्ये प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर प्रमुख भुमिकेत होते.

4/5
काकस्पर्श चित्रपटाचा दाक्षिणात्य रिमेक :
काकस्पर्श चित्रपटाचा दाक्षिणात्य रिमेक :

काकस्पर्श शीर्षक जाहिर नसलेल्या चित्रपटात पुनर्निर्मित केला जात आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श या मराठी चित्रपटाने अनेकांच्या मनात घर केले. यानंतर महेश मांजरेकर अरविंद स्वामी आणि टिस्का चोप्रा या कलाकारांसह हिंदी आणि तमिळमध्ये काकस्पर्श चित्रपटाचा रिमेक करत आहेत. यात आदिनाथ कोठारेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

5/5
मुंबई-पुणे-मुंबई आणि मेड इन विझाग:
मुंबई-पुणे-मुंबई आणि मेड इन विझाग:

सतीश राजवाडे यांच्या मुंबई-पुणे-मुंबईचा रिमेक मेड इन विझाग (MIV) नावाच्या तेलगू चित्रपटात यशविन आणि निकिता नारायण हे कलाकार आहेत. मुंबई पुणे मुंबई प्रमाणेच, मेड इन विझाग या चित्रपटात एका मुलाची आणि मुलीची कथा दाखवली आहे.





Read More