PHOTOS

शस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत

Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. 

...
Advertisement
1/7
विरुपाक्ष
विरुपाक्ष

दक्षिणेकडील हा अभिनेता काही दिवसांपूर्वीच 'विरुपाक्ष' (Virupaksha) या चित्रपटातून झळकला होता. त्यामागोमाग आता तो येत्या काळात स्वत:चेच काका, अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan)सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

2/7
साई धर्म तेज
साई धर्म तेज

असा हा अभिनेता म्हणजे साई धर्म तेज. आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यानं अशी घोषणा केली की चाहतेही चिंतेत पडले. ही घोषणा म्हणजे कलाजगातापासूनचा दुरावा. 

 

3/7
6 महिने साई तेज कलाजगतापासून दूर
 6 महिने साई तेज कलाजगतापासून दूर

येत्या काळात तब्बल 6 महिने साई तेज कलाजगतापासून दूर असेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा शरीरयष्टी सावरण्यासाठी तो हा वेळ स्वत:ला देत आहे. 

 

4/7
मी पुन्हा नव्यानं ...
 मी पुन्हा नव्यानं ...

'प्रेक्षकांना माझ्याकडून कोणतीही खंत नसावी. कारण, मी माझ्या प्रत्येक चित्रपटासाठी सर्वस्व अर्पण करु इच्छितो. मला एक लहानशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, ज्यानंतर मी पुन्हा नव्यानं पुनरागमन करेन. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी मला 6 महिन्यांचा काळ लागणार आहे', असं त्यानं स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. 

 

5/7
भयंकर अपघात
 भयंकर अपघात

2021 मध्ये साई तेजचा एक भयंकर अपघात झाला होता. या अपघातानंतर तो अनेक महिने अंथरुणातच होता. डोक्याला मोठा मार लागला नसला तरीही त्याला शरीराच्या इतर भागांवर जबर मार लागला होता. 

6/7
शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया

प्राथमिक माहितीनुसार साई तेज सध्या त्याच्या या दुखापतींतून सावरण्यासाठी म्हणूनच शस्त्रक्रियांना सामोरा जाऊ इच्छितो. इतकंच नव्हे तर यातून सावरत तो पूर्णपणे नवी सुरुवातही करु इच्छितो असा कयास सध्या लावला जात आहे. 

 

7/7
प्रसिद्धीचं वलय
प्रसिद्धीचं वलय

दाक्षिणात्य कलाकांरांच्या भल्यामोठ्या यादीमध्ये साई धर्म तेजचंही नाव घेतलं जातं. अभिनेता पवन कल्याणचा भाचा असल्यामुळंही त्याच्या नावाभोवती प्रसिद्धीचं वलय कायमच पाहायला मिळतं. 

 





Read More