PHOTOS

'शुभमन फार फार Cute, मी त्याला..'; अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भातील वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया

: शुभमन गिलच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडल्याने तो सध्या चर्चेत असतानाच आता खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीने केल...

Advertisement
1/15

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यातील टी-20 बरोबरच एकदिवसीय सामन्यांसाठीचं उपकर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. झिम्बावेविरुद्धची मालिका भारताने शुभमनच्या नेतृत्वाखाली 4-1 च्या फरकाने जिंकल्यानंतर शुभमनच हे प्रमोशन मानलं जात आहे.

 

2/15

मैदानावरील कामगिरीबरोबरच शुभमन कायमच त्याच्या कथित प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याचं नाव सारा तेंडुलकरशी जोडण्यात आलं तर कधी सारा अली खानबरोबरच. 

 

3/15

मात्र सध्या मैदानाबाहेर चर्चेत असणारा शुभमन एका टीव्ही चॅनेलवरील अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे.  

 

4/15

डिसेंबर महिन्यामध्ये शुभमन गिल या अभिनेत्रीबरोबर लग्न करणार असल्याचं वृत्त व्हायरलं झालं होतं. 

 

5/15

आता 'फिल्मीग्यान' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीनेच यासंदर्भात भाष्य करताना केलेल्या विधानामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

6/15

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे रिधीमा पंडीत असं आहे. शुभमनबरोबरं नाव जोडलं जात असल्याबद्दल तीने उघडपणे भाष्य केलं आहे.

 

7/15

शुभमन आणि आपण लग्न करणार असल्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचं रिधीमाने स्पष्ट केलं आहे. आमच्या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं तिने सांगितलं आहे.

 

8/15

तू शुभमनला डेट करत आहेस का? असं विचारलं असता रिधीमाने "नाही! खरं तर मी त्याला ओळखतही नाही. मला वाटतं तो फार भन्नाट स्पोर्ट्स पर्सन आहे. मात्र मी त्याला ओळखत नाही," असं उत्तर दिलं. 

 

9/15

"मी जेव्हा केव्हा त्याला भेटेन तेव्हा मला खात्री आहे की आम्ही दोघं यावरुन बरंच हसू," असंही रिधीमा म्हणाली.

 

10/15

तसेच शुभमनच्या लूक्सबद्दल बोलताना रिधीमाने, "मला वाटतं की तो फार फार क्यूट आहे. मात्र दुर्देवाने आम्हा दोघांमध्ये काहीही सुरु नाहीये," असं रिधीमाने म्हटलं.

 

11/15

यापूर्वी रिधीमाने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्येही शुभमनबरोबच्या डेटिंगचं वृत्त फेटाळलं होतं. "मला वाटतं की हे लोकांचं इमॅजिनेशन आहे. कोणीतरी बातमी तयार करतं आणि मग ती सोशल मीडियावर व्हायरल होते," असं रिधीमा म्हणाली होती.

 

12/15

"मी शुभमनला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. ही बातमी फारच फालतू आहे," असं रिधीमा म्हणालेली.

 

13/15

"बातमी व्हायरल झाल्यानंतर मला सकाळपासून अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले. मी या अफवांना नकार देऊन देऊन थकले आहे. अखेर मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात पोस्ट केली," असं रिधीमा म्हणाली.

 

14/15

"मी सिंगल असून रिलेशनशीपसाठी तयार आहे. मात्र या अफवांमुळे आता कोणी पुढे येऊन मला प्रपोज करणार नाही. मलाही लग्न करुन सेटल व्हायचं आहे," असं स्वत:च्या रिलेशनशीपबद्दल बोलताना रिधीमाने म्हटलं होतं.

 

15/15

रिधीमाने 'बहू हमारी रजनी कांत' मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तिने 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9' आणि 'बिग बॉस ओटीटी'मध्येही सहभाग घेतला होता.

 





Read More