PHOTOS

• रिप्लाय केला म्हणून 12 वर्षांचा तुरुंगवास! जगभरात खळबळ; नेमकं त्या पोस्टमध्ये होतं काय? पाहा Photos

व्यक्तीला केवळ एका रिप्लायसाठी तब्बल 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? ...

Advertisement
1/11

ही घटना आणि ज्या व्यक्तीला शिक्षा ठोठावण्यात आली ती व्यक्ती सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. नेमकं घडलंय काय? त्याने कोणत्या पोस्टवर रिप्लाय केलेला? त्याला एवढी शिक्षा का देण्यात आली आहे जाणून घेऊयात या प्रकरणाशीसंबंधित फोटोंच्या माध्यमातून...

2/11

इस्लामिक देशांमधील कायदे हे फार कठोर असल्याने या देशांची जगभरामध्ये चर्चा असते. सध्या याच कठोर कायद्यांचा अनुभव इराणमधील एका ब्लॉगरला आला आहे.

3/11

हुसेन शानबेहजादेह नावाच्या इराणी ब्लॉगरला 12 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आहे? गुन्हा केला तर शिक्षा भोगावीच लागते. पण हुसेन शानबेहजादेहचा गुन्हा हा झाला की त्याने रिप्लायमध्ये पूर्णविराम म्हणजेच डॉट टाकला. 

4/11

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या एक्स अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टवर हुसेन शानबेहजादेहने केलेल्या रिप्लाय प्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. 

5/11

फोटोत दिसणारी हीच ती पोस्ट ज्यावर हुसेन शानबेहजादेह यांनी रिप्लाय केलेला.

6/11

हुसेन शानबेहजादेह हे इराणमधील नेतृत्वावर टीका करणारे ब्लॉगर म्हणून ओळखले जातात. ते राजकीय कैदी, महिला अधिकारांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. 

7/11

हुसेन शानबेहजादेह यांना जून महिन्यात अटक झाली असून ती माहिती आता समोर आली आहे. वायव्य इराणमधील अर्दाबील शहरामधून हुसेन शानबेहजादेह यांना अटक करण्यात आली.

8/11

हुसेन शानबेहजादेह यांनी आयातुल्ला अली खामेनी यांच्या पोस्टवर डॉट रिप्लाय केला होता. खामेनी यांनी इराणच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाबरोबरचा फोटो पोस्ट केलेला. त्यावर त्यांनी हा रिप्लाय केला होता.

 

9/11

विशेष म्हणजे हुसेन शानबेहजादेह यांनी केलेल्या डॉट या रिप्लायला आयातुल्ला अली खामेनी यांच्या मूळ पोस्टपेक्षा अधिक लाईक आले. 

10/11

हुसेन शानबेहजादेह यांना 12 वर्षांची शिक्षा सुनावताना त्यापैकी 5 वर्षांची शिक्षा इस्रायल समर्थक कारवाईसाठी देण्यात आली आहे. चार वर्षांची शिक्षा इस्लामिक नेत्याचा अपमान करण्यासाठी तर दोन वर्षांची शिक्षा ऑनलाइन माध्यमातून खोटी माहिती पसरवल्याबद्दल सुनावली आहे. तर एका वर्षाची शिक्षा सत्ताधाऱ्यांविरोधात भाष्य केल्यासाठी सुनावली आहे.

11/11

हुसेन शानबेहजादेह यांचे वकील अमीर रैसेन यांनी, "आम्ही या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. इस्लामिक नेत्याचा अपमान केल्यासंदर्भातील शिक्षेत सूट मिळण्याची अपेक्षा आहे," असं म्हटलं आहे. 





Read More