PHOTOS

शिवसेनेची भाजप कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

Advertisement
1/3

इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेने आज भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोस्टर लावत जोरदार आंदोलन केलं. मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं भाजप प्रदेश कार्यालया समोर पंतप्रधान यांचा निषेध करणारे दोन पोस्टर लावले.

2/3

यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. भाजप प्रदेश कार्यालयाच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी काही मिनिटात दोन्ही पोस्टर हटवले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

3/3

अशी हुल्लडबाजी करण्याऐवजी सत्तेत असलेल्या शिवसेनेने, राज्य सरकारने इंधनाच्या दरातील राज्य सरकारचा कर कमी करून दाखवावा. फडणवीस आणि मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असतांना इंधन दर कमी केले होते, राज्य सरकारने हे करून दाखवावं अशी टीका भाजप नगरसेवक अतुल शाह यांनी यावेळी केली.





Read More