PHOTOS

Shivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड

Rebel Leaders: बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. आज शिवसेनेचे दोन गट...

Advertisement
1/10

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे जेव्हा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोन वेगवेगळ्या शिवसेना दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वर्धापनदिन साजरा करत आहेत. 

2/10

मात्र एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसहीत केलेलं शिवसेनेतील बंड हे काही पहिलं बंड नव्हतं. त्यापूर्वीही शिवसेनेमध्ये मोठी बंड झाली आहेत. ही बंड कोणती ते पाहूयात...

3/10

शिवसेनेतील सर्वात मोठं पहिलं बंड केलं ते सध्या अजित पवार गटात असलेल्या छगन भुजबळ यांनी! 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या भुजबळांनी 1991 मध्ये डिसेंबर महिन्यात भुजबळ यांनी 19 आमदारांसहीत बंड केलं. त्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलं.

 

4/10

1991 साली भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षातील प्रमुख नेते झाले. पुढे 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी बंड केलं असता भुजबळ त्यांच्यासोबत गेले.

 

5/10

शिवसेनेत बंड करुन बाहेर पडणाऱ्यांमध्ये नारायण राणेंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. मूळचे कणकवलीचे असणारे राणे यांनी चेंबूरमधून एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 1990 ला राणे मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1999 ला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्याच वर्षी शिवसेना-भाजपा युतीचा पराभव झाल्याने राणे विरोधीपक्ष नेते झाले.

 

6/10

2005 मध्ये राणेंनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. 2019 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वयाच्या 72 व्या वर्षी ते 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढून खासदार म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडून आले.

 

7/10

राणे आणि भुजबळांच्या बंडापेक्षाही शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा धक्का ठरला तो राज ठाकरेंनी केलेलं बंड! राज ठाकरे हे स्वत: ठाकरे कुटुंबातील असूनही त्यांनी पक्षात होणारी घुसमट आणि आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे असं म्हणत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

 

8/10

2006 च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.

9/10

शिवसेनेमध्ये झालेलं सर्वात ताजं बंड हे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आहे. शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आणि एकंदरित 20 वे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यापासून प्रभावित होऊन शिंदेंनी 1980 च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला. 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली आणि ते निवडणूक जिंकून नगरसेवक झाले. 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2004, 2009, 2014, 2019 असे सलग चार वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारुन पक्षावर दावा सांगितला.

 

10/10

जून 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील एका गटाने शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या असलेल्या महविकास आघाडीच्या सरकारमधून शिंदे 40 आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. नंतर भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाच्या आधारावर त्यांनी सत्ता स्थापन केली. राजकीय परिस्थिती लक्षात घेत भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पद दिलं. शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.

 





Read More