PHOTOS

PHOTO: ₹ 5.34 कोटींचा 1 शेअर! सर्वात महागडे शेअर्स असलेल्या Top 5 कंपन्या पाहिल्यात का?

orld: आपण अशा 5 कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे शेअर्स हे जगातील सर्वात महागडे शेअर्स मानले जातात. या कंपन्यांच्या एका शेअरची कि...

Advertisement
1/13

Most Expensive Stocks in the World: शेअर बाजारामध्ये अनेकदा काही कंपन्यांचे शेअर्स फारच महाग असल्याने गुंतवणूकदार अशा महागड्या शेअर्सकडे पाठ फिरवताना दिसतात. एवढ्या महागड्या शेअर्समध्ये पैसा गुंतवणं छोट्या गुंतवणूकदारांना समजत नाही. त्यामुळेच अनेक कंपन्या शेअर्सची किंमत फार वाढली की शेअर्स स्प्लिट करतात. मात्र काही कंपन्या अशा आहेत ज्यांना शेअर्सची किंमत कितीही असली तरी गुंतवणूकदार येतील की नाही याची फारशी काळजी नसते. 

2/13

आज आपण अशा 5 कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे शेअर्स हे जगातील सर्वात महागडे शेअर्स (Most Costly Shares In World) मानले जातात. या कंपन्यांच्या एका शेअरची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या कंपन्यांचा एखादा जरी शेअर कोणाकडे असला तरी तो मालामाल होईल असं सांगितलं जातं. या कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात...

3/13

सीबोर्ड (Seaboard) : सीबोर्ड ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी समुद्रातील दळणवळण आणि पोर्क म्हणजेच डुकराचं मांस निर्यात करण्याचं काम करते. ही कृषी क्षेत्रातील कच्चामाल वापरुन प्रोडक्ट तयार करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेबरोबरच कॅरेबियन बेटांवरही आपल्या जहाजांच्या माध्यमातून दळवळणाची सेवा पुरवते.

4/13

सीबोर्डच्या एका शेअरची किंमत 3465 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. ही आकडेवारी 27 फेब्रुवारी 2024 ची असून त्या दिवशीच्या करन्सी रेटप्रमाणे भारतीय चलनामध्ये ही किंमत 2.87 लाख रुपये इतकी होते. 

 

5/13

बुकिंग होल्डिंग्स (Booking Holdings) : ही कंपनी बुकिंग डॉट कॉम आणि प्राइजलाइन या प्रसिद्ध कंपन्यांची मातृक कंपनी आहे. दोन्ही प्रसिद्ध ब्रॅण्डची मालकी असलेल्या या कंपन्यांचा पर्यटन क्षेत्रात दबदबा आहे.

 

6/13

ओपन टेबल ही रेस्तराँ बुकिंग कंपनीही बुकिंग होल्डिंग्सच्या मालकीचीच आहे. बुकिंग होल्डिंग्सचा एक शेअर 3499 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 2 लाख 90 हजारांना आहे.

 

7/13

एनव्हीआर (NVR) : महागड्या शेअर्सच्या यादीत एनव्हीआरचा शेअर तिसऱ्या स्थानी आहे. ही एक गृहनिर्माण प्रकल्प उभारणारी म्हणजेच बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. रायन होम्सच्या नावाने या कंपनीचा कारभार चालतो.

8/13

घरं बांधणे आणि विकण्याबरोबर लोकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचं कामही एनव्हीआर कंपनी करते. या कंपनीचा एक शेअर 7569 डॉलर इतका आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 6 लाख 27 हजार इतकी होते.

 

9/13

चोकोलादेफेब्रिकेन लिंड्थ अ‍ॅण्ड स्प्रंगली एजी (Chocoladefabriken Lindt & Sprüngli AG) : हा जगातील दुसरा सर्वात महागडा शेअर (LISN Share Price) आहे. ही स्वित्झर्लंडमधील एक चॉकलेट कंपनी आहे.

 

10/13

'चोकोलादेफेब्रिकेन लिंड्थ अ‍ॅण्ड स्प्रंगली एजी'च्या एका शेअरची किंमत अमेरिकी शेअर बाजारामध्ये 12,271 डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 10 लाख 17 हजार इतकी होते. ही किंमत 27 फेब्रुवारीच्या मार्केट ट्रेण्डनुसार आहे.

11/13

बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) : हा जगभरातील सर्व शेअर मार्केट्सचा विचार केला तरी सर्वात महागडा शेअर आहे. हा शेअर इतका महाग आहे की बर्कशायर कंपनीला त्यांचे स्वस्तातील शेअर्सही बाजारात उतरवावे लागले.

12/13

एक स्वस्त आणि एक जगातील सर्वात महाग असे 2 शेअर्स सध्या बर्कशायरच्या नावावर असल्यानेच शेअर बाजारात कंपनीचे 2 वेगवेगळे शेअर्स रिफ्लेक्ट होतात. याला सीरीज-1 आणि सीरीज-2 असं नाव आहे. बर्कशायर सीरीज-1 चा शेअर हा खरा मूळ शेअर आहे. या एका शेअरची किंमत 6 लाख 45 हजार अमेरिकी डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात ही रक्कम 5.34 कोटी इतकी होते. सर्वच शेअर्सची किंमत बाजारातील घडामोडींप्रमाणे बदल राहते हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

13/13

Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.





Read More