PHOTOS

उत्सव नात्यांचा...; दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शरद पवार- अजित पवार एकत्र, पाहा खास फोटो

ळीसुद्धा याला अपवाद ठरली नाही. दिवाळीतील पाडव्याच्या निमित्तानं शरद पवारांसोबत अजित पवारही एकाच फ्रेममध्ये द...

Advertisement
1/7
पवार कुटुंब आणि दिवाळी सेलिब्रेशन
पवार कुटुंब आणि दिवाळी सेलिब्रेशन

Sharad Pawar Ajit Pawar : दिवाळी म्हटलं की महाराष्ट्रातील काही कुटुंबांच्या सेलिब्रेशनवर आणि स्नेहसंमेलनावर सर्वांच्याच नजरा असतात. पवार कुटुंब हे त्यापैकीच एक. यंदाच्या वर्षी या कुटुंबाच्या  दिवाळी सेलिब्रेशनला राजकीय किनारही पाहायला मिळाली. 

 

2/7
राजकीय दुरावा
राजकीय दुरावा

निमित्त ठरलं ते म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत केलेलं बंड आणि त्यानंतरचा शरद पवार यांच्यासोबतचा त्यांचा दुरावा. 

3/7
दिवाळी पाडवा...
दिवाळी पाडवा...

पवार कुटुंबीय कायमच दिवाळीच्या निमित्ताने गोविंद बागेत एकत्र येतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळालं. यावेळी रात्रीचे दहा वाजून गेले तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार तिथं पोहोचले नव्हते. 

 

4/7
आणि अजित पवार गोविंदबागेत आले...
आणि अजित पवार गोविंदबागेत आले...

पण, रात्री दहानंतर ते गोविंदबागेत दाखल झाले. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेतली. खुद्द सुप्रिया सुळे यांनीच सोशल मीडियावर या क्षणांचे फोटो शेअर केले.

5/7
यंदाची दिवाळी खास
यंदाची दिवाळी खास

पवार कुटुंबाची ही दिवाळी यंदा जास्तच खास होती, कारण कितीही राजकीय हेवेदावे असले तरीही नाती ही त्याहूनही महतत्वाची असतात हेच इथं पाहायला मिळालं. 

6/7
मतभेद विसरून साजरा करणार सण
मतभेद विसरून साजरा करणार सण

पाड्व्यानंतर आता सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त काटेवाडीला जाणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असं यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. 

7/7
पुढली पिढी
पुढली पिढी

दरम्यान, या कुटुंबातील पुढली पिढी अर्थात पवार कुटुंबातील लेकरांमध्येही असाच एकोपा पाहायला मिळत आहे. त्यामुळं कुटुंबाची परंपरा पुढंही सुरुच राहील यात शंका नाही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. (सर्व छायाचित्र सौजन्य- सुप्रिया सुळे) 





Read More