PHOTOS

शाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील

यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर...

Advertisement
1/9
शाहरुखनं प्रचंड मेहनतीनं आजचा हा डोलारा उभा केला
शाहरुखनं प्रचंड मेहनतीनं आजचा हा डोलारा उभा केला

Shah Rukh Khan Birthday : देशातील एक युवा स्वातंत्र्यसैनिक मीर ताज मोहम्मद खान यांचा मुलगा शाहरुख खान. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याला कधीही गृहित धरु नये, हे शाहरुख त्याच्या वडिलांकडूनच शिकला. वयाच्या 15 व्या वर्षी वडील आणि 26 व्या वर्षी आईला गमावणाऱ्या शाहरुखनं प्रचंड मेहनतीनं आजचा हा डोलारा उभा केला. 

 

2/9
7 गावांपर्यंत वीज पोहोचवण्यात मोलाचा हातभार
 7 गावांपर्यंत वीज पोहोचवण्यात मोलाचा हातभार

2009 मध्ये त्यानं सौरउर्जा प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक करत ओडिशातील तब्बल 7 गावांपर्यंत वीज पोहोचवण्यात मोलाचा हातभार लावला. या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर 61 वर्षांनी वीज पोहोचली होती. 

 

3/9
Pyramide con Marni पुरस्कार
 Pyramide con Marni पुरस्कार

2011 मध्ये शाहरुखला युनेस्कोकडून Pyramide con Marni पुरस्कार देण्यात आला होता. समाजकार्यासाठी हा पुरस्कार मिळवणारा शाहरुख पहिलाच भारतीय ठरला होता. 

 

4/9
MEER Foundation
MEER Foundation

शाहरुखनं 2013 मध्ये MEER Foundation या समाजसेवी संस्थेची सुरुवात करत ही संस्था वडिलांना समर्पित केली. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना या संस्थेकडून मदतीचा गात दिला जातो. असंख्य रुग्णांच्या वैद्यकिय उपचारांचा खर्च उचलला जातो. 

 

5/9
33 लाख रुपयांची रक्कम मदतनिधीमध्ये
33 लाख रुपयांची रक्कम मदतनिधीमध्ये

शाहरुखची दानशूर वृत्ती इतकी की त्यानं उत्तराखंड पुरांच्या वेळी 33 लाख रुपयांची रक्कम मदतनिधीमध्ये दिली होती. तर, चेन्नई पूरांमध्ये त्यानं. प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये दिले होते. 

 

6/9
कर्करोगग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी दान
कर्करोगग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी दान

2014 मध्ये शाहरुखची मालकी असणाऱ्या कोलकात्याच्या संघानं IPL जिंकलं आणि यातून मिळालेली विजेतेपदाची 15 कोटी रुपयांची रक्कम त्यानं कोलकाता आणि मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी दान केली. 

 

7/9
कोविड संशोधनपर कामांसाठी मदतीचा हात
कोविड संशोधनपर कामांसाठी मदतीचा हात

2020 मध्ये आलेल्या कोविडच्या लाटेतही शाहरुखनं कोविड संशोधनपर कामांसाठी मदतीचा हात म्हणून पंतप्रधान मदतनिधीमध्ये आर्थिक मदत देऊ केली होती. 

 

8/9
अनेकांपर्यंत मदतीचा हात
अनेकांपर्यंत मदतीचा हात

या न त्या कारणानं शाहरुख सातत्यानं अनेकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवत असतो. किंबहुना आपल्या पडत्या काळात ज्यांनी आपली साथ दिली त्या कोणालाही तो विसरलेला नाही. 

 

9/9
समाजोपयोगी कार्य
समाजोपयोगी कार्य

University of Law in London मधून सामाजिक कार्यांसाठीची मानद पदवी मिळाल्यानंतर शाहरुखनं एक सुरेख विचार मांडला होता, 'एखाद्याची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मदत करणं टाळावं. कारण, समाजोपयोगी कार्य हे कायम पडद्यामागं राहूनच केलं गेलं पाहिजे.' प्रसिद्धीझोतात असतानाही त्यापलिकडे विचार करणारा शाहरुख त्याच्या याच विचारसरणीमुळं खरा King आहे... नाही का? 

 





Read More