PHOTOS

स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या

 सोन्याच्या किमतीमुळे तुम्हीदेखील आतापर्यंत सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  ...
Advertisement
1/9
स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या
स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या

Sovereign Gold Bond Scheme: आपल्या देशात सोन्याला खूप जास्त महत्व दिलं जातं. अगदी बाळाच्या बारश्यापासून ते लग्न समारंभापर्यंत सोनं बनवलं जातं. एकाचवेळी मोठ्या रक्कमेची सोन्याची वस्तू बनवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. अशावेळी सोन्यात आधी केलेली गुंतवणुक नंतर उपयोगी येते. केंद्र सरकार तुम्हाला ही संधी देत असतं. 

2/9
सोने महाग
सोने महाग

सध्या सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोने महाग आहे. त्यामुळे इच्छा असूनही लोकांना हवे असले तरी ते विकत घेता येत नाही.  सोन्याच्या किमतीमुळे तुम्हीदेखील आतापर्यंत सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

3/9
सोव्हेरियन गोल्ड बाँड 2023-24 सिरिज IV
सोव्हेरियन गोल्ड बाँड 2023-24 सिरिज IV

पुढील आठवड्यापासून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही केंद्र सरकारच्या गोल्ड स्कीम अंतर्गत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. गव्हर्नमेंट गोल्ड बॉण्ड म्हणजेच सोव्हेरियन गोल्ड बाँड 2023-24 सिरिज IV बद्दल  आपण जाणून घेऊया. 

4/9
सोव्हेरियन गोल्ड बाँड म्हणजे काय?
सोव्हेरियन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सर्वप्रथम सोव्हेरियन गोल्ड बाँड म्हणजे काय? हे आधी समजून घेऊ. सार्वभौम गोल्ड बाँड ही सरकारची सुवर्ण रोखे योजना आहे. यामध्ये तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. बाजारापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करून तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता.

5/9
99.9 टक्के शुद्ध सोने
 99.9 टक्के शुद्ध सोने

या गोल्ड बाँडद्वारे तुम्हाला 99.9 टक्के शुद्ध सोने खरेदी करण्याची संधी मिळते. आरबीआय हे सुवर्ण रोखे म्हणजे गोल्ड बॉण्ड जारी करते. भविष्यात तुम्हाला SGB ​​चे डिमॅटमध्ये रूपांतर करता येते. 

6/9
गुंतवणुकीवर मोठी सवलत
गुंतवणुकीवर मोठी सवलत

तुम्ही या गोल्ड बाँडद्वारे 24 कॅरेटच्या 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करू शकता. गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करून पैसे भरल्यास तुम्हाला सोव्हेरियन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीवर मोठी सवलत मिळेल. 

7/9
गुंतवणूक कालावधी
गुंतवणूक कालावधी

तुम्ही 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत  सोव्हेरियन गोल्ड बाँड 2023-24 सिरिज IV मध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजेच या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पाच दिवस आहेत. गुंतवणुकीनंतर 21 फेब्रुवारीपासून बॉण्ड जाहीर केले जातात.

8/9
कुठून खरेदी कराल?
कुठून खरेदी कराल?

आरबीआयने निर्धारित केलेल्या कमर्शियल बॅंकामधून तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून सोने खरेदी करु शकता. 

9/9
बीएसई, एनएसई प्लॅटफॉर्मवर
बीएसई, एनएसई प्लॅटफॉर्मवर

यासोबतच तुम्हाला पोस्ट ऑफिस स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनकडून देखील सोव्हेरियन गोल्ड बाँड घेता येतील. बीएसई, एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील तुम्हाला सोव्हेरियन गोल्ड बाँड घेता येईल. 





Read More