PHOTOS

1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

: आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परि...

Advertisement
1/7

आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहे. यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारसह राजा संक्रांती आणि ईद - उल - अजहा यांचा समावेश आहे. 

2/7

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर झाले असून 1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे. 

3/7

त्याशिवाय वाहतूक नियमाबद्दल झाले आहे. वेगाने वाहन चालवल्यास दंड ₹ 1,000 ते ₹ 2,000 च्या दरम्यान असेल. मात्र, जर एखादा अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याला ₹25,000 इतका मोठा दंड द्यावा लागणार आहे. तर वाहन मालकाची नोंदणी रद्द करण्यात येईल. तर अल्पवयीन व्यक्ती 25 वर्षांची होईपर्यंत परवान्यासाठी अपात्र असेल. 

4/7

आता तुम्ही 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करु शकणार आहात. पण जर तुम्ही ते ऑफलाइन करणे निवडल्यास, तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी ₹50 द्यावे लागणार आहेत.

5/7

एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. येत्या 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. 

6/7

ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमती देखील बदल होणार आहे. अशा परिस्थितीत, 1 जूनला त्यांच्या नवीन किंमती जाहीर होतील. 

7/7

SBI क्रेडिट कार्डचे नियम 1 जून 2024 पासून बदलणार असून SBI काही क्रेडिट कार्डांसाठी सरकारी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत, असं सांगितलंय. यामध्ये स्टेट बँकेचे AURUM, SBI Card ELITE, SBI Card ELITE Advantage आणि SBI Card Pulse, SimplyCLICK SBI कार्ड, SimplyClick Advantage SBI कार्ड (SBI Card Prime) आणि SBI कार्ड प्राइम (SBI Card PRIME) यांचा समावेश आहे. 





Read More