PHOTOS

मराठमोळ्या राजा-राणीचा रॉयल कारभार! 100 वर्षांनंतरही हनिमूनच्या फोटोंचा चार्म कायम

ल अनेक प्रांतांमध्ये अनेक संस्थानांची सत्ता आणि त्यांचं राज्य होतं. प्रत्येक संस्थानानं आपल्या प्रांताचं वेगळेपण सिद्ध केलं होतं. काळ प...

Advertisement
1/8
रॉयल कारभार
रॉयल कारभार

History of Indian Royals : भारतातील संस्थानं आणि त्यांच्याबाबतची चर्चा जेव्हाजेव्हा होते तेव्हातेव्हा इंदूरचे महाराज यशवंतराव होळकर द्वितीय आणि महाराणी संयोगिताबाई होळकर यांच्या नावांचा उल्लेख हमखास होतो. ही जोडी त्यांच्या रॉयल कारभारामुळं कायमच चर्चेत असायची. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

2/8
सहजीवनाचा प्रवास
सहजीवनाचा प्रवास

महाराणी आणि महाराज या दोघांनीही इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं होतं. 1924 मध्ये या दोघांनी लग्नबंधनात अडकत सहजीवनाचा प्रवास सुरु केला आणि या प्रवासात त्यांनी जगभ्रमंती केली. हॉलिवूड चित्रपटांच्या सेटवरही या जोडीचा सर्रास वावर असे. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

3/8
हनिमूनचे फोटो
हनिमूनचे फोटो

हनिमूनसाठी या जोडीनं त्या काळात फ्रान्स गाठलं होतं. तेव्हा व्हिज्युअल आर्टिस्ट  Man Ray यांनी त्यांची काही खास छायाचित्र टीपली. या छायाचित्रकारांनुसार मिळालेल्या माहितीनुसार राजेसाहेबांनी कान्समध्ये 7 स्टार हॉटेलचा संपूर्ण मजलाच बुक केला होता. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

4/8
राजा राणीची चित्र
राजा राणीची चित्र

एका फ्रेंच चित्रकारानं राजा आणि राणीची सुरेख चित्रही रेखाटली होती. त्या काळात इंदूरच्या या शाही घराण्याची श्रीमंती इतकी होती की, जागतिक ख्यातीची चित्र, एकाहून एक सरस कार त्यांच्या संग्रही होत्या. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

5/8
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना हजेरी
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना हजेरी

महाराणी संयोगिता बाई कमालीच्या स्टायलिस्ट आणि फॅशन प्रेमी होत्या. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना Vionnet, Schiaparelli या सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आणि Lanvin सारख्या प्रख्यात ब्रँडच्या कपड्यांना त्यांची पसंती असे. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

6/8
राजे आणि राणी यांचं नातं
राजे आणि राणी यांचं नातं

राजे आणि राणी यांचं नातं आंतराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय होतं. त्यांच्याकडे जगातील सर्वात महागडी रत्नही होती. ज्यामध्ये 47 हून अधिक पेअर आकाराची रत्न समाविष्ट होती. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

7/8
स्थापत्यावर प्रेम
स्थापत्यावर प्रेम

1930 मध्ये राजेसाहेबांनी एका जर्मन स्थापत्य विशारदाला माणिक बाग उभारण्यासाठी नियुक्त केलं होतं. इंदूरच्या केंद्रस्थानी आधुनिक युरोपीय स्थापत्यशैलीचा हा अनमोल नजराणा. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 

8/8
कमाल छायाचित्र
कमाल छायाचित्र

(छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)

 





Read More