PHOTOS

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!

ाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्या...

Advertisement
1/9

या दिवशी बहीण भावाचं औक्षवाण करुन त्याचा मनगटावर रक्षा सूत्र म्हणजे राखी बांधते. शास्त्रानुसार औक्षणाच्या ताटात कुठल्या 8 गोष्टी असाव्यात त्याबद्दल जाणून घेऊयात. 

2/9
अक्षता
अक्षता

 हिंदू धर्मात पूजा असो किंवा औक्षवाणाचं ताट अक्षता अतिशय महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. अक्षता हे पूर्णतेचे प्रतीक मानलं जातं. अक्षता लावल्याने भावाचं आयुष्य वाढतं आणि घरात सुख समृद्धी नांदते. 

3/9
दिवा
दिवा

औक्षवाणाच्या ताटात तूपाचा दिवा असावा. धार्मिक कार्यात दिवा हा सकारात्मकतेचं प्रतिक आहे. 

4/9
कुंकु हळद
कुंकु हळद

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ताटात हळद कुंक ठेवलं पाहिजे. भावाला टिळक केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाची कमतरता जाणवत नाही. 

5/9
चंदन
चंदन

ज्योतिषशास्त्रानुसार भावाला चंदनाचा टिळा लावला पाहिजे. त्यामुळे मस्तक शांत होतं. त्याशिवाय भावाला भगवान विष्णू आणि गणेशाचा आशिर्वाद प्राप्त होतो. 

6/9
नारळ
नारळ

नारळ म्हणजे श्रीफळ हे हिंदू धर्मात पवित्र आणि शुभ मानलं जातं. प्रत्येक शुभ कामात नारळाशिवाय पूर्ण होतं नाही. 

7/9
रक्षासूत्र
रक्षासूत्र

रक्षासूत्र म्हणजे राखी, याशिवाय तर औक्षवाणाचं ताट पूर्णच होऊ शकत नाही. शास्त्रानुसार भावाला त्याच्या राशीनुसार त्या त्या रंगाच्या राख्या बांधा. 

8/9
मिठाई
मिठाई

भावाचं औक्षवाण केल्यानंतर त्याला गोड भरवण्याची परंपरा आहे. त्यामुळे मिठाईशिवाय औक्षणाच ताट अपूर्ण मानलं जातं.

9/9
गंगाजल
गंगाजल

हिंदू धर्मात गंगाजल हे पवित्र मानलं जातं. त्यामुळे भावाची वाईट शक्तीपासून रक्षण करण्यासाठी औक्षणाच्या ताटात गंगाजल ठेवणं शुभ मानलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

 





Read More