PHOTOS

पांढरे तीळ, गुजरातचं मीठ, चांदीचा नारळ अन्... मोदींनी बायडेन यांना का भेट दिल्या 'या' 10 गोष्टी?

To President Biden: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत...

Advertisement
1/17

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीचा नारळ, गुजरातचं मीठ, पांढरे तिळ, सोन्याचं नाणं, चांदीचं नाणं, चंदन अशा गोष्टी भेट दिल्या आहेत. मात्र जगातील महासत्तेतच्या सर्वोच्च नेत्याला या गोष्टी भेट देण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

2/17

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली.

 

3/17

मोदी आणि जो बायडेन यांच्या भेटीच्या वेळेस अमेरिकेच्या फार्स्ट लेडी जिल बायडन ही उपस्थित होत्या.

4/17

पंतप्रधान मोदींनी यावेळेस जो बायडेन यांना एक खास भेट दिली असून यामध्ये अगदी पांढऱ्या तिळांचाही समावेश आहे. ही भेट काय आहे आणि त्याचा अर्थ काय समजून घेऊयात आणि या भेटवस्तूंचे फोटोही पाहूयात...

5/17

पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना भेट दिलेल्या गोष्टींमध्ये एका चंदनाच्या पेटीचाही समावेश असून त्या आतमध्ये काही खास गोष्टीही आहेत.

6/17

चंदनाची ही पेटी राजस्थानमधील जयपूर येथील कारगिरांनी खास बायडेन यांच्यासाठी तयार केली आहे. बायडेन यांना दिलेल्या या पेटीमध्ये मैसूरमधील चंदन असल्याची माहिती देण्यात आली आहे.

7/17

चंदनाच्या या पेटीमध्ये गणपतीची मुर्तीही आहे. गणपती हा सर्व अडथळे दूर करणारा आणि सर्वात आधी पूजा केला जाणारा देव असल्याने गणेशाची मूर्ती देण्यात आली आहे.

8/17

कोलकात्यामध्ये मागील 5 पिढ्यांपासून धातूच्या मूर्ती बनवण्याचं काम करणाऱ्या कारागिरांकडून ही मूर्ती बनवून घेण्यात आली आहे. 

9/17

तसेच बायडन यांना देण्यात आलेल्या चंदनाच्या पेटीमध्ये दिवाही आहे. प्रत्येक हिंदू घरामध्ये आवर्जून असलेली गोष्ट म्हणजे दिवा. हा चांदीचा दिवा कोलकात्यामध्ये मागील 5 पिढ्यांपासून चांदीचं काम करणाऱ्या कारागिरांकडून बनवून घेतला आहे.

10/17

सहस्त्र पूर्ण चंद्रोदय साजरा करताना दहा वेगवेगळ्या गोष्टी भेट देण्याची परंपरा दास दानम या पश्चिम बंगालमधील पद्धतीत असते. यात गौदान, भूदान, तिळदान, हिरण्यदान, अजयदान, धान्यदान, वस्त्रदान, गुडदान, रुपयादन आणि लवणदानाचा समावेश असतो. हे सर्व मोदींनी बायडेन दांपत्याला समजावूनही सांगितलं.

11/17

पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना दिलेल्या चंदनाच्या पेटीमध्ये या सर्व दानांचं प्रातिनिधिक स्वरुप असल्याचं दिसून येत आहे. 

12/17

यामध्ये चांदीचा एक छोटा नारळही आहे. हा नारळ पश्चिम बंगालमधील कारागिरांनी तयार केला असून तो गौदानाचं प्रतिक म्हणून देण्यात आला आहे.

13/17

भूदान म्हणून मैसूरमधील चंदन बायडेन यांना भेट देण्यात आलं आहे.

14/17

तामिळनाडूमधील पांढरे तिळही बायडेन यांना देण्यात आले आहे. तिळदानाचं प्रतिक म्हणून हे पांढरे तिळ दिले आहेत.

15/17

हिरण्यदान म्हणजेच सोनं दानासाठी राजस्थानमधील कारागिरांनी साकारलेलं सोन्याचं नाणंही देण्यात आलं आहे. हे 24 कॅरेट सोन्याचं नाणं आहे.

16/17

या चंदनाच्या पेटीमध्ये चांदी दानासाठी 99.5 टक्के शुद्ध अशा चांदीचं नाणही बायडन यांना देण्यात आलं आहे. हे नाणं राजस्थानमधील कारागिरांनी साकारलं आहे.

17/17

तसेच लवणदान म्हणून गुजरातमधील मीठही या चंदनाच्या पेटीमध्ये बायडन यांना देण्यात आलं आहे. 





Read More