PHOTOS

कोकणची माणसं साधीभोळी; You Tube गाजवतायत 'ही' मंडळी

ाणसं साधीभोळी.... असं म्हणत कलाजगतानंही या कोकणी माणसांना सर्वांच्याच मनात मानाचं नव्हे तर प्रेम आणि हक्...

Advertisement
1/8
कोकणची माणसं साधीभोळी
कोकणची माणसं साधीभोळी

युट्यूबवर स्क्रोल करता करता एकदा या तरुणी मंडळींच्या नजरेतून घडणारी कोकणची सफर अनुभवाच... 

2/8
बिनधास्त मुलगी
बिनधास्त मुलगी

गौरी पवार.... नावा प्रमाणेच बिनधास्त भावा! ही 'बिनधास्त मुलगी' आणि तिची आजी युट्यूब खऱ्या अर्थानं गाजवत आहेत. कोकणची भाषा, शाब्दीक विनोद हे सर्वकाही तिच्या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतं. (छाया सौजन्य- बिनधास्त मुलगी व्हिडीओ स्क्रीनग्रॅब)

 

3/8
प्रगत लोके
प्रगत लोके

प्रगत लोके हे नाव युट्यूब जगतात नवं नाही. त्याचे परदेशातील व्लॉग्स जितके चर्चेत राहिले, तितकेच कोकणातील व्हिडीओसुद्धा अनेकांनी पाहिले आणि शेअरही केले. (छाया सौजन्य- प्रगत लोके व्हिडीओ स्क्रीनग्रॅब)

 

4/8
गोष्ट कोकणातली
गोष्ट कोकणातली

अनिकेत रासम हा तरुण, त्याची आजी आणि आता त्याचं संपूर्ण कुटुंब 'गोष्ट कोकणातली' या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातली संस्कृती, सोपे खाद्यपदार्थ आणि शेतीच्या कामांपर्यंतची झलक दाखवतो. (छाया सौजन्य- गोष्ट कोकणातली व्हिडीओ स्क्रीनग्रॅब)

 

5/8
मालवणी लाईफ
मालवणी लाईफ

खोल समुद्रातील मासेमारी असो किंवा मग रात्रीच्या अंधारात चिखलभरल्या खाडीमध्ये केलेली मासेमारी असो. मालवणी लाईफचे अनेक व्हिडीओ कुतूहल ताणून धरणारे असतात. (छाया सौजन्य- मालवणी लाईफ व्हिडीओ स्क्रीनग्रॅब)

 

6/8
ऋषभ तोडणकर
ऋषभ तोडणकर

हा तरुण गावखडी आणि त्यानजीकच्या भागासोबतच कोकणचं दर्शन व्ह्यूअर्सना घडवतो. अनेक सुरेख समुद्रकिनारे, कोकणातील जत्रा अशी रंगीबेरंगी कोकणाची झलक त्याच्या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते. (छाया सौजन्य- ऋषभ तोडणकर व्हिडीओ स्क्रीनग्रॅब )

 

7/8
एस फॉर सतीश
एस फॉर सतीश

मंडणगड आणि त्यानजीकच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या गावखेड्यांची सफर या चॅनलमधून आपल्याला हा दादा घडवतो. आपल्या कुटुंबासह तो कोकणातील साधं राहणीमान सर्वांसमोर आणताना दिसतो. (छाया सौजन्य- एस फॉर सतीश व्हिडीओ स्क्रीनग्रॅब )

 

8/8
कोकण संस्कृती
कोकण संस्कृती

कोकणातील पारंपरिक पदार्थ, साधीभोळी माणसं आणि अर्थाक कोकणातील संस्कृतीवर या चॅनलच्या माध्यमातून नजर टाकली जाते. (छाया सौजन्य-कोकण संस्कृती व्हिडीओ स्क्रीनग्रॅब )





Read More