PHOTOS

Modi Surprise Visit To Central Vista: नव्या संसद भवनाचे भव्यदिव्य रुप पाहून डोळे दिपतील! PM मोदी Surprise Visit ला आले अन्...

ral Vista: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारच्या सुमारास अचानक निर्माणाधीन असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीला भेट दिली. या भेटीदरम्यान न...

Advertisement
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अचानक दिल्ली येथे बांधकाम सुरु असलेल्या सेंट्रल विस्ता या नव्या संसदेच्या इमारतीला भेट दिली.

2/10

यावेळेस पंतप्रधान मोदींबरोबर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला देखील होते. अन्य अधिकारी आणि या इमारतीचे बांधकाम करणारे कर्मचारीही यावेळेस उपस्थित होते.

3/10

पंतप्रधान मोदींनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या ठिकाणाला भेट दिली आणि येथील सोयी सुविधा आणि कामाची पहाणी केली.

4/10

मोदींनी जवळजवळ एक तास या नव्या संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहाची पहाणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

5/10

नवी सभागृहं ही आताच्या सभागृहांपेक्षा मोठी असतील. लोकसभेची आसन क्षमता 770 असेल तर राज्यसभेची 384 इतकी असेल.

6/10

मोदींनी यावेळेस या नव्या इमारतीत केलेली कलाकुसरही पाहिली.

7/10

यावेळेस मोदींनी ही इमारत उभारण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली.

8/10

सेंट्रल विस्ता हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नवीन संसद हा याच प्रोजेक्टचा भाग आहे.

9/10

सध्या नवी दिल्लीमधील 3 किलोमीटरच्या राजपथ, राष्ट्रपती भनवापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या भागाचं नुतनीकरण करुन या ठिकाणी नवीन कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

10/10

पंतप्रधान निवासाबरोबर उपराष्ट्रपतींचं निवासस्थानही याच प्रकल्पामध्ये नव्याने उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्पाचं काम टाटा प्रोजेक्टस लिमिटेडला देण्यात आलं आहे.

 





Read More