PHOTOS

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लाग...

Advertisement
1/10

पुन्हा एकदा इस्रायल आणि हमासमध्ये वाद पेटला आहे. गाझा पट्टीतून इस्त्रायलच्या दिशने तब्बल 5000 रॉकेट डागण्यात आले. 

2/10

यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली. तर हमासच्या दहशतवाद्यांनी 35 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचा दावाही करण्यात आला आहे. 

3/10

 हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढंच नाही तर त्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेतली. 

4/10

अनेक लढाऊ विमाने गाझा पट्टीत घुसली आणि त्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. 

5/10

गाझावर राज्य करणारा अतिरेकी गट, हमास बंदूकधारी अनेक ठिकाणी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये आले.

6/10

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे भारताने इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने शनिवारी इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये भारतीयांना अनावश्यक हालचाली टाळण्यास आणि सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्यास सांगितले आहे.  

7/10

इस्रायलसाठी गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे. इस्रायलकडे देशांतर्गत आणि बाहेरून मध्यपूर्वेतील सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक गुप्तचर नेटवर्क असल्याचं बोलं जातं. 

 

8/10

सोशल मीडियावर हमासच्या बंदूकधाऱ्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ते इस्त्रायली शहरातील रस्त्यांवर गोळीबार करताना दिसत आहेत.

9/10

शहरातून असे धुराचे लोट आकाशात जाताना दिसत होते. यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

10/10

इस्रायलचा विरोध करणार्‍या हमास या इस्लामिक अतिरेकी गटाने 2007 मध्ये भूभाग ताब्यात घेतल्यापासून इस्रायलने गाझावर नाकेबंदी केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यात चार युद्धं झाली आहेत. इस्त्रायल, हमास आणि गाझामधील इतर लहान अतिरेकी गट यांच्यात आतापर्यंत असंख्य वेळा संघर्ष झाला आहे.