PHOTOS

...अन् 140 कोटी स्वप्नं आकाशात झेपावली; भारतीयांचा ऊर भरुन आणणारे Chandrayaan-3 Launching फोटो पाहाच

ccessfully: दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. इस्रोने एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-3...

Advertisement
1/8

चांद्रयान-2 च्या अपयशानंतर तब्बल 4 वर्षांनी 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर आज चांद्रयान-3 लॉन्च केलं.

2/8

14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. भारताची ही तिसरी चंद्र मोहीम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केली आहे.

3/8

हे उड्डाण झाल्यानंतर आणि हे यान नियोजित कक्षेत स्थिरावल्यावर 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. 

4/8

'चांद्रयान-3'च्या या उड्डाणाच्या 26 तासांपूर्वीच उड्डाणासाठीचं काऊण्ट डाऊन सुरु करण्यात आलं होतं. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरील दुसऱ्या बेसवरुन चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात आलं.

5/8

चांद्रयान-3 चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्यासाठी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरला मोठ्या नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

6/8

चांद्रयान-3 सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 ला चंद्रावर उतरणार आहे.

7/8

चांद्रयान-3 मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

8/8

चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करण्याची किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.





Read More