PHOTOS

Shiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?

ा जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पा...

Advertisement
1/11
प्रतापगडचं युद्ध
प्रतापगडचं युद्ध

उपलब्ध नोंदींनुसार 10 नोव्हेंबर 1659 मध्ये साताऱ्यानजीक असणाऱ्या प्रतापगडासाठी संघर्ष झाला. मराठे आणि आदिलशाहीच्या अफजलखानामध्ये हा संघर्ष झाला होता. 

2/11
कोल्हापूरची लढाई
कोल्हापूरची लढाई

28 डिसेंबर 1659 मध्ये मराठा मावळे आणि आदिलशाहीच्या सैन्यामध्ये तुंबळ लढाई झाली होती. 

 

3/11
पावनखिंडीतील झुंज
पावनखिंडीतील झुंज

13 जुलै, 1660 मध्ये कोल्हापुरातील विशालगडाच्या नजीक असणाऱ्या आव्हानात्मक खिंडीमध्ये आदिलशाहीच्या सिद्दी मसुदसोबत मराठ्यांच्या दलानं लढा दिला. यामध्ये वीर मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले होते. 

 

4/11
चाकणची लढाई
चाकणची लढाई

छत्रपतींच्या नेतृत्वाखाली मराठे आणि मुघल साम्राज्यामध्ये ही लढाई 1660 मध्ये लढली गेली. 

 

5/11
उंबरखिंडीतील संघर्ष
उंबरखिंडीतील संघर्ष

2 फेब्रुवारी 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्त्वाखाली मुघलांच्या करतलब खान याच्याशी मराठ्यांनी झुंज दिली. 

 

6/11
सुरतची लढाई
सुरतची लढाई

5 जानेवारी 1664 मध्ये गुजरातच्या सुरतमध्ये शिवबांच्या मावळ्यांनी मुघल साम्राज्यातील इनायत खानच्या सैन्याशी लढा दिला होता. 

 

7/11
पुरंदरचा लढा
पुरंदरचा लढा

1665 मध्ये मुघलांसोबत मराठ्यांची ही पुरंदरची लढाई पार पडली. 

 

8/11
सिंहगडाची झुंज
सिंहगडाची झुंज

4 फेब्रुवारी 1670 मध्ये पुण्यातील सिंहगडासाची झुंज देण्यात आली. यामध्ये महाराजांच्या आशीर्वादानं मराठ्यांचं नेतृत्त्वं सुभेदार तानाजी मालुसरे यांनी केलं होतं. जिथं त्यांनी उदयभान राठोडला तगडी झुंज दिली होती. 

 

9/11
कल्याणची लढाई
कल्याणची लढाई

1682 ते 1683 दरम्यान मुघल साम्राज्याच्या बहादुर खानानं मराठ्यांना नमवत कल्याणवर ताबा मिळवला होता. 

 

10/11
भूपाळगडाचं युद्ध
भूपाळगडाचं युद्ध

1679 मधील या युद्धामध्येही मराठ्यांना मुघलांनी पराभूत केलं होतं. 

 

11/11
संगमनेरची लढाई
संगमनेरची लढाई

1679 मधील संगमनेरच्या लढाईमध्ये मराठ्यांसमोर मुघल उभे ठाकले होते. उपलब्ध माहितीनुसार हे छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळातील अखेरचं युद्ध ठरलं. 

 





Read More