PHOTOS

Weekend Releases: विकेंडचा फिल्मी तडका! पावसात फिरण्यापेक्षा 'हे' 6 चित्रपट OTT वर घरी बसूनच बघा

अनेक सुपर स्टारचे चित्रपट आणि सिरीज रिलीज होणार आहे. ZEE5, Prime Video, Jio Cinema, Disney Plus Hotstar, Netflix सारख्या प्लॅटफॉर्मवर...

Advertisement
1/7

जुलैच्या दुसऱ्या विकेंडला तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीजचा तडका पाहिला मिळणार आहे.  सस्पेन्स थ्रिलरपासून हॉरर कॉमेडी आणि देशभक्तीपर्यंतचा कंटेंट पाहिला मिळणार आहे. 

2/7
वाइल्ड वाइल्ड पंजाब (Wild Wild Punjab)
वाइल्ड वाइल्ड पंजाब (Wild Wild Punjab)

जर तुम्हाला कॉमेडी चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या आठवड्यात 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक असून या चित्रपटात मनजोत सिंग, वरुण शर्मा, सनी सिंग यांच्यासोबत प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता जस्सी गिल झळकणार आहे. 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' 10 जुलैला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झालाय. 

3/7
शोटाइम (Showtime) - सीजन वन का दूसरा पार्ट
शोटाइम (Showtime) - सीजन वन का दूसरा पार्ट

शो जगतातील गडद सत्य दाखवणाऱ्या या वेब सिरीजचा पहिल्या भागातील पुढचे एपिसोड प्रदर्शित होणार आहे. इमरान हाश्मी, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, नसीरुद्दीन शाह आणि श्रिया सरन यांसारख्या कलाकारांने अप्रतिम काम केलंय. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. तुमची ही उत्सुकता संपली असून OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर 'शोटाइम' सीझन पहिल्याचा दुसरा भाग पाहू शकणार आहात. 

4/7
ककूड़ा (kakuda)
ककूड़ा (kakuda)

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट 'काकुडा'  OTT प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम आणि रितेश देशमुख यांचा मोस्ट अवेटेड हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' देखील ओटीटीला टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय. तुम्ही 12 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर 'काकुडा' पाहू शकता. 

5/7
कमांडर करण सक्सेना (Commander Karan Saxena )
कमांडर करण सक्सेना (Commander Karan Saxena )

रॉ एजंट कमांडर करण सक्सेनाच्या कथेत अभिनेता गुरमीत चौधरीने मुख्य भूमिका साकारलीय. या ॲक्शन थ्रिलर मालिकेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पाहायला मिळणार आहे. ही वेब सिरीज 8 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म disney plus hotstar पाहता येणार आहे. 

6/7
36 Days
36 Days

नेहा शर्माचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 36 डेज देखील या आठवड्यात OTT वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात नेहाने फराह नावाच्या मुलीची भूमिका असणार आहे. त्याशिवाय पूरब कोहली, श्रुती सेठ, शारिब हाश्मी, अमृता खाविलकर आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार आहेत. तुम्ही 12 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर ते पाहू शकणार आहात. 

7/7
पिल (pill web series)
पिल (pill web series)

रितेश देशमुखच्या या मालिकेत औषध उद्योगातील काळे सत्य समोर आणणार आहे. या सिरीजमध्ये रितेश देशमुखने डॉ. प्रकाशची भूमिका साकारलीय. या मालिकेतून रितेश देशमुख ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. तुम्ही 12 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म जिओवर पाहू शकणार आहे. 





Read More