PHOTOS

New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

ण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखा...

Advertisement
1/6

नव्या वर्षाची सुरुवात हँगओव्हरनं (home remedies to cure hangover ) न करता तो कोणत्या घरगुती उपायांनी दूर कराल ते एकदा पाहा. 

 

2/6

टोमॅटो ज्यूस (tomato juice)- टोमॅटोच्या रसामध्ये ग्लुकोज आणि साखरेतील असे काही घटक असतात ज्यामुळं अल्कोहोल पचायला मदत होते. त्यामुळं रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं. हँगओव्हर झालाय टोमॅटोचा ज्यूस घ्या. 

3/6

आलं (ginger) - मद्यसेवनानंतर पोटामध्ये होणारी जलजळ दूर करण्यासाठी आणि हँगओव्हर घालवण्यासाठी आलंही फार मदत करतं. यामुळं मळमळही होत नाही. कच्च आलं किंवा आल्याचा रस तुम्ही हँगओव्हर घालवण्यासाठी खाऊ शकता. 

4/6

कच्चं सफरचंद किंवा केळी (apple and banana)- फ्रुट सलाड किंवा कच्ची फळं हँगओव्हर मोठ्या प्रमाणात कमी करतात. त्यातही काहीसं कच्चं सफरचंद आणि केळं मोठ्या फायद्याचं. रिकाम्या पोटी होणारी डोकेदुखी यामुळं कमी होते. 

5/6

पोटभर नाश्ता (breakfast)- रात्रभर केलेल्या पार्टीनंतर सकाळी डोकं भणभणल्यास आधी पोटभर नाश्ता करा. यामुळं मद्यसेवनादरम्यान तुमच्या शरीरातील गमावलेली पोषक तत्व परत मिळवण्यास मदत होते. 

6/6

भरपूर पाणी प्या (water)- अल्कोहोल किंवा मद्यसोवनानं तुमच्या शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळं सकाळी उठून तुम्हाला तहानल्यासारखं जाणवू शकतं. घाबरु नका, भरपूर पाणी प्या, शांत बसा. बरं वाटेल. 

 





Read More