PHOTOS

मुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी? लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार

dates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. डिसेंब...

Advertisement
1/7
मुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार
मुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार

 राज्यातील पहिली भूमिगत मार्गिका असलेली 'मेट्रो ३' आता संपूर्ण सज्ज झाली आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असलेली अखेरची आणि नववी गाडी अखेर आरे कारशेड परिसरात दाखल झाली आहे. 

2/7
160 फेऱ्या
160 फेऱ्या

मुंबई मेट्रो ३ मार्गावर नऊ गाड्या धावणार असून दररोज 160 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. 

3/7
पहिला टप्पा
पहिला टप्पा

मुंबई मेट्रो 3 ही मेट्रोचा पहिला टप्पा आता डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.  'मेट्रो ३' ही उत्तर मुंबईला दक्षिण मुंबईशी पश्चिम उपनगरातून जोडणारी, आरे ते कफ परेड अशी मार्गिका आहे.

4/7
27 स्थानके
27 स्थानके

३३ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. त्यापैकी २६ स्थानके भूमिगत असतील. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा असेल.

5/7
98 टक्के पूर्ण
 98 टक्के पूर्ण

मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून स्थानकांची उभारणी 98 टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाले आहेत. 

6/7
27 स्थानके
27 स्थानके

आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड,डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके पहिल्या टप्प्यात असतील. 

7/7
300 प्रवासी क्षमता
300 प्रवासी क्षमता

'मेट्रो ३'मधील प्रत्येक डब्याची क्षमता ३०० प्रवाशांची आणि गाडीची क्षमता २,४०० ते २,६०० प्रवासी इतकी असेल. डिसेंबर २०२५ पर्यंत या मार्गिकेची दैनंदिन प्रवासीसंख्या १३. लाख इतकी असेल.





Read More