PHOTOS

हिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?

पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग...

Advertisement
1/7
Amboli Ghat
 Amboli Ghat

Amboli Ghat : आंबोली घाट पर्यटकांसाठी आणि त्याहूनही कोकणवासियांसाठी, गोव्याला रस्ते मार्गानं जाणाऱ्यांसाठी नवा नाही. हो, पण याच आंबोली घाटातील काही गोष्टी मात्र आता पर्यटकांना नव्यानं खुणावताना दिसणार आहेत. त्यातलाच एक म्हणजे बाहुबली धबधबा. 

2/7
धबधब्याचं उदघाटन
 धबधब्याचं उदघाटन

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या धबधब्याचं उदघाटन होत असून, आंबोलीतील पर्यटनाला वाव देण्यासाठी उचलण्यात आलेल्या टप्प्यांपैकी हा एक महत्त्वाचा टप्पा. 

3/7
पर्यटनाला वाव
पर्यटनाला वाव

पर्यटनाला वाव देणाऱ्या या मोहिमेअंतर्गत पाच धबधब्यांच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यापैकी चार धबधब्यांवर आता पर्यटकांना जाता येईल असं खुद्द केसरकर यांनीच माहिती देत सांगितलं. 

4/7
तुम्हीही इथं येऊ शकता.
तुम्हीही इथं येऊ शकता.

राज्याच्या वन विभागाच्या अख्त्यारित ही कामं हाती घेण्यात आली असून, धबधब्याच्या ठिकाणी पायऱ्यांचं काम आणि इतरही काही कामं पूर्णत्वास नेण्यात आली. इतकंच नव्हे तर, 12 ते 16 ऑगस्टदरम्यान आंबोली वर्षा महोत्सवाचंही आयोजन करण्यात आल्यामुळं सु्ट्ट्यांच्या निमित्तानं तुम्हीही इथं येऊ शकता. 

5/7
घाटपरिसराचाच एक भाग
 घाटपरिसराचाच एक भाग

पश्चिम घाटपरिसराचाच एक भाग असणाऱ्या आंबोलीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. जैवविविधतेच्या 8 महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या या घाटात बहुविध प्रकारची जीवसृष्टी तुम्हाला थक्क करते. 

6/7
एक ना अनेक पर्याय
एक ना अनेक पर्याय

सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, घाटात असणारी प्राचीन मंदिरं, हिरण्यकेशी, नांगरकास असे धबधबे असे एक ना अनेक पर्याय या भागात भटकंतीसाठी येणाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. 

7/7
इथला निसर्ग तुमची वाट पाहतोय...
इथला निसर्ग तुमची वाट पाहतोय...

थोडक्यात काय, तर पर्यटकांच्या दृष्टीनं आंबोली घाटात कोणकोणत्या सुविधा देता येतील यावर राज्य शासनानं लक्ष दिलं असून, पर्यटनाला वाव देण्यासाठी एक पाऊल उचललं असून, एक सजग पर्यटक म्हणून तुम्हीही या भागाला नक्की भेट द्या. इथला निसर्ग तुमची वाट पाहतोय...





Read More