PHOTOS

मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?

ा सुरु झाला की शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे डोळे लागलेले असताच ते आकाशाकडे. पेरणी झाली आहे आता मान्सून कधी बरसणार याकडे शेतकरी वाट पाहत...

Advertisement
1/11

सक्रीय झालेला मान्सून आज केरळात धडकण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये काही काळ रेंगाळल्यावर आता मान्सूनने वेग पकडलाय.

2/11

मान्सून वेगाने नैऋत्येकडे सरकत असल्यामुळे आजच मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो. 

3/11

मान्सून 4 जूनला केरळात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. तो अंदाज अचूक सिद्ध होण्याचे संकेत आहेत.

4/11

सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याचं आयएमडीने म्हटलंय.

5/11

मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार प्रिमान्सून सरी कोसळतील. 

6/11

 तर महाराष्ट्रात वरुणराजाचे 10 जूनला आगमन होणार आहे, असी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

7/11

यंदा राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे. 

8/11

राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

9/11

विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा 100 टक्के पावसाची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

10/11

एकीकडे राज्यात मान्सून उशिराने दाखल होणार असल्यानं वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची आजही सुटका होणार नाहीए.

11/11

आज मुंबईत कमाल तापमान 35 तर किमान तापमान 30 पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 





Read More