PHOTOS

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

ा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी...

Advertisement
1/9
वडिलांनी रिक्षा चालवून सिराजला बनवलं क्रिकेटर, पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...
वडिलांनी रिक्षा चालवून सिराजला बनवलं क्रिकेटर, पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराज आज घातक गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. एकट्या सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ बाद केलाय.  पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि दसुन शानाका, कुसल मेंडीस यांना बाद केलंय. 

2/9
मोहम्मद सिराजचे देशभरातून कौतुक
मोहम्मद सिराजचे देशभरातून कौतुक

मोहम्मद सिराजचे देशभरातून कौतुक होतंय. पण त्याचे हे कौतुक पाहायला त्याचे वडिल आज हयात नाहीत. त्यांनी रिक्षा चालवून सिराजला क्रिकेटर बनवलं. सिराजच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया. 

3/9
गरीब कुटुंबात जन्म
गरीब कुटुंबात जन्म

मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. 

4/9
वडिलांचे स्वप्न
वडिलांचे स्वप्न

घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

5/9
सिराजचे दुर्दैव
सिराजचे दुर्दैव

ऑटो ड्रायव्हर असूनही सिराजच्या वडिलांनी आयुष्यात कधीही पैशाची कमतरता जाणवू दिली नाही. एक वडील म्हणून त्यांनी सिराजसाठी सर्व काही केले. पण सिराजचे दुर्दैव बघा, या क्रिकेटमुळेच तो वडिलांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकला नाही. वडिलांचा चेहरा शेवटच्या वेळी पाहू शकणार नाही.

6/9
कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य
कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य

वडील त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. सिराजला क्रिकेटर बनवण्यासाठी ते त्याला दररोज 100 रुपये द्यायचे. ज्यातून सिराज त्याच्या बाईकमध्ये पेट्रोल भरून क्रिकेटच्या सरावासाठी जायचा. त्यावेळी त्याच्याकडे प्लॅटिना बाईक असायची.

7/9
फुफ्फुसात संसर्ग
फुफ्फुसात संसर्ग

मोहम्मद सिराजचे वडील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. आयपीएलदरम्यानच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

8/9
प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही
प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही

तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. हैदराबादच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये रात्रंदिवस ऑटो चालवून आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी कष्ट करणाऱ्या गौस यांचा अखेर मृत्यू झाला.

9/9
शेवटची भेट तीन महिन्यांपूर्वी
शेवटची भेट तीन महिन्यांपूर्वी

सिराजची त्याच्या वडिलांशी शेवटची भेटही सुमारे तीन महिन्यांपूर्वी झाली होती. यूएईमध्ये आयोजित आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीत खेळण्यासाठी सिराज 20 ऑगस्टच्या सुमारास आरसीबी संघासह भारतातून उड्डाण केले होते. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस या क्रिकेटपटूला कसोटी संघात स्थान मिळाले होते.





Read More