PHOTOS

'विराट कोहली वर्ल्ड कप Final मध्ये...'; मेस्सीचा उल्लेख करत मायकल वॉर्नची भविष्यवाणी

Cup Glory For Virat Kohli: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळातील फलंदाज विराट कोहली तु...

Advertisement
1/10

भारतीय संघावर अनेकदा बोचरी टीका करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा संपेपर्यंत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे करेल असं मत व्यक्त केलं आहे. वॉर्नने थेट लिओनेल मेस्सीबरोबर विराटची तुलना करत हे विधान केलं आहे.

2/10

विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. भारताच्या सर्व सामन्यांमध्ये विराटने दमदार कामगिरी केली आहे. विराटने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी केली आहे. पाकिस्तान वगळता सर्वच संघाविरोधात विराटने उत्तम फलंदाजी केली आहे.

3/10

बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यामध्ये विराटने संघाला विजय मिळवून देताना सिक्स मारत आपलं 48 वं एकदिवसीय शतकही अगदी शेवटच्या चेंडूवर झळकावलं.

4/10

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्येही विराटने 95 धावांची खेळी करत भारताला तब्बल 20 वर्षानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत किवीजवरील विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. या विजयासहीत भारताने वर्ल्ड कपमध्ये सलग पाचव्या विजयावर नाव कोरलं.

5/10

सध्या विराट कोहली हा वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये 118 च्या सरासरीसहीत 354 धावा करुन दुसऱ्या स्थानी आहे.

6/10

'क्लब प्रेरी फायर' नावाच्या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार वॉर्नने विराटबद्दल मोठं भाकित केलं आहे. "धावांचा पाठलाग करण्याचा विचार केला तर विराटच्या तोडीस तोड देणारा एकही फलंदाज नाही. विराटने अंतिम सामन्याआधी 49 वं शतक झळकावलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसेच तो अंतिम सामन्यात 50 वं शतक झळकावू शकतो. त्याच्या आकडेवारीवरुनच हे दिसून येत आहे. मी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे की सर्वोत्तम खेळाडू वर्ल्ड कपमध्येच उत्तम कामगिरी करतात. यामधूनच त्याची महानता दिसून येते," असं वॉर्न म्हणाला आहे.

7/10

वॉर्नने वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मोठे खेळाडू विशेष प्रदर्शन करतात या विधानाला समर्थन करण्यासाठी लिओनेल मेस्सीचं उदाहरण दिलं आहे.

8/10

अर्जेंटिनाकडून खेळताना लिओनेल मेस्सीने थेट वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तशाच प्रकार विराट कोहलीही दमदार कामगिरी करुन भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल असं वॉर्नने म्हटलं आहे. 

9/10

"तुम्ही फुटबॉलपटूंकडे पाहा. लिओनेल मेस्सीला अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता आणि त्याने जिंकून दाखवला. विराट कोहलीने यापूर्वीच वर्ल्ड कप जिंकला आहे," असं वॉर्न म्हणाला.

10/10

"विराटची सध्याची त्याची कामगिरी पाहता तो भारताला पुन्हा जेतेपद मिळवून देईल असं दिसतंय," असंही वॉर्नने म्हटलं आहे.





Read More