PHOTOS

अमिताभ बच्चन यांना आपला मुलगा मानत होते Mehmood Ali, पण बिग बीच्या एका चुकीने नातं तुटल, मेहमूदने आयुष्यभर...

ग 60 च्या दशकाचा काळ खूप गाजवला होता. महमूद हे अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर' होते. पण बिग बीची एक चुकूनही हे नात तुटलं आणि आयुष्यभर त्...

Advertisement
1/7

 मेहमूद अली हे भारतातील प्रसिद्ध कॉमिक कलाकारांपैकी एक असून त्यांनी 60 दशक गाजवलं. ते आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. अभिनेत्याने 1961 मध्ये राजेंद्र कुमार यांच्या 'ससुराल' या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये फिल्मफेअरसोबतच्या संभाषणात महमूद अलीचा भाऊ अन्वर अली म्हणाला होता, 'ते आपल्या जीवनशैलीच्या बाबतीत राजासारखे जगले, पण ते मोठ्या मनाचेही होते. त्यांना कारची आवड होती आणि एकेकाळी इम्पाला, एमजी, जग्वार आणि इतरांसह 24 कार त्यांच्याकडे होत्या. 

2/7

इतकंच नाही तर या दिग्गज अभिनेत्याने संघर्ष करणाऱ्या अनेक अभिनेत्यांना मदत केलीय. त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहमूदने पहिल्यांदा बिग बीमध्ये उज्ज्वल भविष्य पाहिलं आणि ते बिग बीला आपल्या मुलगा मानायचे. या कारण त्यांनीच बिग बींना त्यांनी पैसे कमवायला शिकवले होते. 

3/7

सलीम खान-जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटात मेहमूद अली यांनी अमिताभ यांना मुख्य भूमिका दिली. यानंतर त्यांना 1973 मध्ये रिलीज झालेला 'जंजीर' हा चित्रपट मिळाला, जो अमिताभ यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. 2004 मध्ये मेहमूद यांचं निधन झाले तेव्हा अमिताभ बच्चन यांनाही त्यांची आठवण झाली. 

4/7

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय होतं की, 'एक अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मला नेहमीच मदत केली. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला महमूद मदतनीसांपैकी एक होते. 'बॉम्बे टू गोवा'मध्ये मला मुख्य भूमिका देणारे ते पहिले निर्माते होते. सलग अनेक फ्लॉप चित्रपटानंतर मी घरी परतण्याचा विचार केला तेव्हा मेहमूद साहबचा भाऊ अन्वरने मला थांबवलं.'

5/7

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, एका रेडिओ ब्रॉडकास्टरने महमूद अली यांना त्यांच्या घोड्यांबद्दल विचारलं तेव्हा ते अभिमानाने म्हटलं होतं, 'सर्वात वेगवान घोडा अमिताभ आहे. ज्या दिवशी त्याला गती मिळेल, तो सर्वांना मागे सोडेल. मात्र, त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये अमिताभ यांच्यासोबतच्या नातेसंबंधातील कटुता व्यक्त केली. मात्र नेहमी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आशा व्यक्त केली की ते अधिक उंचीवर पोहोचतील. 

6/7

एका मुलाखतीत मेहमूदने कबूल केले होतं की 'अमिताभ बच्चन यांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, मात्र त्यांच्या एका कृतीने त्यांना धक्का बसला. ते म्हणाले, 'जेव्हा त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन पडले होते, तेव्हा मी त्यांना पाहण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो होतो. पण माझी बायपास सर्जरी झाली तेव्हा अमिताभ त्यांच्या वडिलांसोबत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आले होते, पण ते मला भेटायला आले नाहीत.'

7/7

'खरा बाप खरा असतो, तर खोटा बाप खोटा असतो हे अमिताभने तिथे सिद्ध केले. जरी त्याला माहित आहे की मी या रुग्णालयात आहे, तो मला भेटायला आला नाही, किंवा मला लवकर बरे होण्यासाठी कार्ड पाठवलं नाही किंवा मला आशा आहे की तो इतर कोणाशीही असं वागणार नाही.'





Read More