PHOTOS

हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न

uth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या ...

Advertisement
1/14

इन्स्टाग्रामवर तुम्ही सुद्धा कायमोची (Kimochii) या अकाऊंटला फॉलो करत असाल तर या अकाऊंटवरील फोटो जरा नीट जवळून पाहा. आता आम्ही असं का सांगतोय असा प्रश्न पडला असेल तर त्यामागील कारण आपण पुढे पाहूयात...

2/14

तरुणींच्या या बोल्ड फोटोंमागे एक पुरुष आणि त्याच्या पत्नीचं सुपीक डोकं आहे असं सांगितल्यास तुम्ही नक्कीच गोंधळून जाल यात शंका नाही. पण हे खरं आहे.

 

3/14

"मला एआय इमेजेस बनवण्यामध्ये 2023 च्या मध्यापासून अधिक रस वाटू लागला. मी मोबाईलवर ग्राफिक डिझायनिंगसंदर्भात काम करताना मला यात रुची निर्माण झाली," असं कायमोची अकाऊंट हॅण्डल करणाऱ्या तरुणाने सांगितलं.

4/14

होय तुम्ही वाचलं ते खरं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे सर्व फोटो एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्सच्या मदतीने एका तरुणाने तयार केले आहेत. 'बिझनेस इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या व्यक्तीने नावं न सांगण्याच्या अटीवर या अकाऊंटच्या जन्माची गोष्ट सांगितली. 

5/14

"एआय कसं काम करतं हे मला जाणून घेण्याची इच्छा होती. मी सुरुवातीला लॅण्डस्केप इमेज तयार करायचो. मी जास्त कॉमिक्समध्ये रमणारा व्यक्ती आहे. मी हेच कॉमिक्स एआयमध्ये जमतात का पाहिलं आणि त्याचे रिझल्ट्स फारच थक्क करणारे होते," असं या व्यक्तीने तरुणींचे फोटो तयार करण्यास सुरुवात कशी केली याबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. त्याने तयार केलेले फोटो पाहून तुम्ही सुद्धा थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

6/14

एआयच्या माध्यमातून लोक किती पैसा कमवतात हे मी एका लेखामध्ये वाटलं. मला हे फार रंजक वाटलं आणि मी सुद्धा मुलींचे असे एआय फोटो तयार करुन पैसे कमवू शकतो असा विचार करुन एआय इमेज बनवू लागलो. मी कायमोचीवरुन वेगवेगळ्या तरुणींचे फोटो तयार करुन पोस्ट करण्याआधी बरेच प्रयोग केल्याचं या तरुणाने सांगितलं.

7/14

दरम्यानच्या काळात माझ्या कंपनीने मला नोकरीवरुन तुला काढून टाकलं जाऊ शकतं असे संकेत दिल्याने पैसे कसे कमावावे मी या विचारात मी होतो. एआय इन्फ्युएन्सर होऊ मी चांगले पैसे कमवू शकतो असं मला वाटल्याने मी हे फोटो तयार करु लागल्याचं या तरुणाने सांगितलं.

8/14

इंटरनेटवर थोडी माहिती शोधल्यानंतर मला असं समजलं की अशी एक संपूर्ण कम्युनिटी आहे. मी एका ग्रुपमध्ये सहभागी झालो आणि तिथे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण तयार केलेले फोटो प्रमोट कसे करावे हे ही मी शिकल्याचं हा तरुण सांगतो. त्याच्या या शिक्षणाची झलक या अकाऊंटवरील खरे वाटणारे फोटो पाहूनच दिसते.

 

9/14

कायमोची (Kimochii) या अकाऊंटला 44 हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. या अकाऊंटवरुन तरुणांचे बोल्ड एआय फोटो पोस्ट केले जातात, असं या तरुणाने सांगितलं.

 

10/14

मी एआयच्या मदतीने तयार केलेले तरुणांचे काही अधिक बोल्ड फोटो कंटेट पेड कंटेंट म्हणून पोस्ट करतो. ओन्लीफॅन्स प्रमाणे इथेही पैसे भरा आणि फोटो पाहा तत्वावर काम चालतं. यामधून मला पैसे मिळतात, असं या तरुणाने सांगितलं.

11/14

इंटरनेटवर सेक्सी कंटेटला अधिक किंमत असून पैसे भरुन लोक हा कंटेट पाहतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र हे आपण म्हणतो तितकं सोपं नसतं. मी महिन्याला 300 ते 400 अमेरिकी डॉलर्स (24,800 रुपये ते 33,100 रुपये) कमवले तरी मला आनंद होतो, असं या क्रिएटरने प्रांजळपणे मान्य केलं.

12/14

या सुंदर चेहऱ्याचा निर्माता असलेला हा तरुण या अकाऊंटवरुन कोणाशीही बोलत नाही. मला फॉलोअर्सबरोबर बोलायला आवडत नाही. मी ते टाळतो. यामागील कारण म्हणजे मी एआय कॅरेक्टर तयार करतो. मला लोकांशी खोटं बोलायला आवडत नाही. म्हणून मी चॅटच करत नाही, असंही त्याने सांगितलं.

 

13/14

मी कायमोचीचे वेगवेगळे अवतार तयार करताना ती समुद्रकिनारी, स्विमींग पूलजवळ काय करेल असा विचार करुन एआय एमेज तयार करतो. ती खरी नसली तरी आता ती माझं बाळ असल्याप्रमाणेच आहे, असं हा क्रिएटर म्हणतो.

14/14

अनेकदा मला काही सूचत नाही तेव्हा माझी बायको मला कल्पना सुचवते. ती सुद्धा यामध्ये फार उत्साहाने रस घेते, असं या तरुणाने सांगितलं. म्हणजेच बायकोच्या मदतीने हा तरुण तरुणींचे बोल्ड एआय फोटो तयार करतो.

 





Read More