PHOTOS

Makar Sankranti 2023 : चुकीच्या पद्धतीनं लावू नका हळदी- कुंकू; वाईट परिणाम होण्यापेक्षा वाचा ही माहिती

वरीची हळदी कुंकू इतर कुणाला लावताना धांदलच उडते. नेमकं यासाठी कोणतं बोट वापरायचं हेच तिला कळत नाही. त्यामुळं चारचौघांत नाचक्की ह...

Advertisement
1/5

कुंकू आणि हळद या गोष्टी सहसा दोन भुवयांच्या मध्यभागी किंवा कपाळाच्या बरोबर मधोमध लावल्या जातात. असं करत असताना बोटामुळं या भागावर हलकासा दाब दिला जातो. हे बिंदू संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ज्यामुळं स्नायूंचा ताण कमी होऊन चेहऱ्याची लकाकी वाढते. 

2/5

कुंकू लावल्यामुळं शरीरात नकारात्मक शक्ती प्रवेश करु शकत नाहीत. सहसा कुंकू आणि हळद अंघोळीनंतर लावावं. 

3/5

तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळी कुंकू लावताय, तर अशा वेळी मध्यमेचा वापर करा. शास्त्रात सांगितल्यानुसार कुंकू लावताना कायम मध्यमेचा होणं अपेक्षित असतं. 

4/5

असं केल्यामुळं समोरच्या व्यक्तीच्या शरीरात असणारी वाईट उर्जा या बोटानं रोखली जाते. दुसऱ्या कोणत्याही बोटानं दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावल्यास या नकारात्मक शक्ती सहजगत्या आपल्या शरीरात येऊ शकतात. 

5/5

तेव्हा मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) वाट पाहण्यापेक्षा या क्षणापासूनच तुम्ही कुणालाही हळद- कुंकू लावत असाल तर या लहानसहान पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वत:सोबत इतरांचंही आरोग्य जपा. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)





Read More