PHOTOS

बारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय

ail Student: इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत...

Advertisement
1/8
बारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय
बारावीत नापास झाल्यास पुढे काय? घाबरु नका! तुमच्यासमोर 'या' कोर्स, नोकरीचे पर्याय

Course After 12th Failed: इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची माहिती देण्यात आली आहे.  

2/8
बारावीचा निकाल
बारावीचा निकाल

बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 

3/8
अनेक पर्याय
अनेक पर्याय

बारावी उत्तीर्ण उमेदवारांकडे करिअर करण्याचे अनेक पर्याय असतात. आर्ट्स, सायन्स, कॉमर्ससह अनेक विविध क्षेत्रात तुम्ही करिअर करु शकता. पण बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्यांचं काय? त्यांच्याकडे पुन्हा बारावी देण्याचा पर्याय आहे. 

4/8
करिअरचे पर्याय
करिअरचे पर्याय

बारावी अनुत्तीर्ण झालात तरी काळजी करु नका. टोकाचे पाऊल तर अजिबात उलचू नका. कारण तुमच्याकडे देखील चांगले करिअर करण्याचे, कोर्स करण्याचे, पैसा कमावण्याचे अनेक पर्याय आहेत. 

5/8
इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्स
इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्स

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी दहावीच्या मार्कशिटच्या आधारे इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्स करु शकता. तुम्ही यात कोणत्या विषयाचे ज्ञान घेतले तर तुम्हाला नोकरी मिळणं सोपं जाईल. यामध्ये तुमच्याकडे मॅकेनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग असे पर्याय तुमच्याकडे आहेत. 

6/8
इतर डिप्लोमा कोर्स
इतर डिप्लोमा कोर्स

इंजिनीअरिंग व्यतिरिक्त तुमच्याकडे डिप्लोमा कोर्सचा पर्याय आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण ही पात्रता असते. येथून तुम्हाला खासगी सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल. अॅनिमेशन डिप्लोमा, इंटिरियर डिझाइन मास्टर डिप्लोमा, फॅशन डिप्लोमा, आयआयएफए सारख्या संस्था या तुमच्यासमोर चांगला पर्याय आहेत. 

7/8
कॉम्प्युटर कोर्स
कॉम्प्युटर कोर्स

वरील कोणताही पर्याय तुम्हाला स्वीकारायचा नसेल तर कॉम्प्युटर कोर्सच्या मदतीने तुम्ही चांगले करिअर करु शकता. व्हिडीओ एडीटींगपासून एचटीएमएल, ड्रीमव्ह्यूअर, मोबाईल क्रॅश कोर्स, हार्डवेअर आणि नेटवर्किंग सारखे पर्याय आहेत. 

8/8
सरकारी नोकरी
सरकारी नोकरी

सरकारकडून अनेक पदांवर भरती निघते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येतात. अशा नोकरींसाठी तुम्ही तयार असायला हवे.