PHOTOS

कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?

एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजक...

Advertisement
1/12
कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?
कधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?

Ajit Pawar and Devendra Fadanvis Education: महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षाच प्रचंड वेगाने बदलताना दिसतंय. इथल्या राजकारणात इतके ट्वीस्ट अॅण्ड टर्न्स आले की कोणी याचा विचारही केला नव्हता. या सर्व राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 बड्या नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

2/12
अनेक गोष्टींचे साम्य
अनेक गोष्टींचे साम्य

कधीकाळचे राजकीय शत्रू 2 मित्र आता एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजकारण अशा अनेक गोष्टींचे साम्य दोघांमध्ये आहे.

3/12
22 जुलै रोजी वाढदिवस
22 जुलै रोजी वाढदिवस

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला. अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा करतात.

4/12
आजोळी झाले शिक्षण
आजोळी झाले शिक्षण

अजित पवार यांनी आपले प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पूर्ण केले. येथील देवळाली प्रवरा हे त्यांचे आजोळ. येथे ते दहावीपर्यंच शिकले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांना मुंबईत यावे लागले.

5/12
आयुष्याला वेगळं वळण
आयुष्याला वेगळं वळण

पुढे ते मुंबईत आले. त्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण एवढ्यातच त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.

6/12
अचानक आली जबाबदारी
 अचानक आली जबाबदारी

दरम्यानच्या काळाता अजित पवारांवरील वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या आकस्मिक निधनाने अजित पवारांवर अचानक जबाबदारी येऊ ठेपली होती.

7/12
शिक्षण अर्धवट राहिले
 शिक्षण अर्धवट राहिले

यामुळे मुंबई सोडून अजित पवारांनी बारामतीला परतण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना आपले पुढचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.  

8/12
राजकीय प्रवास
राजकीय प्रवास

शिक्षण सोडले असले तरी अजित पवार यांचा सहकार क्षेत्र, राजकारण यातला अनुभव दिवसेंदिवस वाढत होता. सहकारी संस्थांमधून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. पुढे अनेक सामाजिक कार्य करत राजकीय प्रवास झाला.

9/12
22 व्या वर्षी महापौर
 22 व्या वर्षी महापौर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती.वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. फडणवीसांनाा आपण विधानसभेत अत्यंत मुद्देसूद बोलताना ऐकले असेल. यामागे त्यांच्या राजकीय अनुभवासोबत शिक्षणाचाही तितकाच मोठा वाटा आहे. 

10/12
प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षण

नागपूरच्या शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून देवेंद्र फडणवीस यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

11/12
कायद्याची पदवी
 कायद्याची पदवी

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे जाऊन नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांनी 5 वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. 1992 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली.

12/12
प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिप्लोमा
प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिप्लोमा

लॉची पदवी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत त्यांनी डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.





Read More