PHOTOS

Mahaparinirvan Din 2023:असा झाला होता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह!

3: बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या ब्राम्हण समाजविरोधात लढा केला त्याच समाजाची त्यांनी दुसरी पत्...

Advertisement
1/9

वंचितांच्या हक्कासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसरात्र लढले होते.   

2/9

बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढ्यात त्यांच्या पहिल्या पत्नी माता रमाबाई यांचा सिंहाचा वाटा होता. काही काळानंतर रमाबाई यांचं क्षयरोगाने निधन झालं होतं.

3/9

रमाबाईंच्या जाण्याने बाबासाहेब एकाकी पडले होते, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती . बाबासाहेबांच्या जवळच्यांनी दुसऱ्या लग्नाचा आग्रह केल्यानं आंबेडकरांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता.

4/9

बाबासाहेबांनी एका ब्राम्हण कुटुंबातील, पेशाने डॉक्टर असलेल्या 'शारदा कबीर ' यांच्याशी विवाह केला होता.

5/9

15 एप्रिल 1948 रोजी दिल्लीत 15-20 निमंत्रितांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचं लग्न झालं होतं.

6/9

लग्नानंतर 'शारदा कबीर' या 'सविता आंबेडकर' झाल्या. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना माई म्हणून हाक मारत होते.

 

7/9

बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या ब्राम्हण समाजविरोधात लढा केला त्याच समाजाची त्यांनी दुसरी पत्नी केली म्हणून अनेकांनी टीका केली होती. 

8/9

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झालं. यानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल काहींनी संशय व्यक्त केला होता.

9/9

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईंवर बाबासाहेबांची हत्या केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले. 





Read More