PHOTOS

Heat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

n Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमान...

Advertisement
1/7
उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...
उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

अजमेरच्या सोमलुर जंगलात एका बिबट्याचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात उष्माघातामुळं या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. उन्हाळ्यात खूप जास्त तहान लागल्याने पाण्याच्या शोधात बिबट्या फिरत होता. भुक आणि तहान यामुळं बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

2/7

 उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्यामुळं अनेक उष्माघाताची प्रकरणे समोर येत आहेत. उष्माघातामुळं स्ट्रोकसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. उष्माघात टाळण्यासाठी काय करु शकतो, हे जाणून घेऊया. 

3/7
उष्माघाताची कारणे
उष्माघाताची कारणे

भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे किंवा तापमान जास्त असलेल्या ठिकाणी काम करणे. घट्ट कपडे वापरणे

 

4/7
उष्माघाताची लक्षणे
उष्माघाताची लक्षणे

मळमळणे, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, भरपूर घाम येणे. 

5/7
काय काळजी घ्याल?
काय काळजी घ्याल?

शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे असते. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फने झाकावे. पाणी पिणे, ओआरएस, ताक, लस्सी प्यावे. उन्हातून घरात आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. तसंच, बाहेरुन आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने अंघोळ करु नका. थोडावेळ शांत बसून मग फ्रेश व्हायला जा.  

6/7

उन्हात बाहेर फिरताना सौम्य रंगाचे कपडे घाला. कॉटनचे कपडे घालावे. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. 

7/7
Disclaimer
Disclaimer

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 





Read More