PHOTOS

Lalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक 

...
Advertisement
1/7
10 दिवसांचा पाहुणचार
10 दिवसांचा पाहुणचार

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : 10 दिवसांचा पाहुणचार आणि असंख्य भाविकांच्या मनोकामना ऐकल्यानंतर आता गणपती बाप्पा त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. 

 

2/7
गणेश नगरी
गणेश नगरी

मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी मुंबईतील गणेश नगरी या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या लालबाग परळ या भागांमध्ये भाविकांचा जनसागर लोटला. 

3/7
तोबा गर्दी
 तोबा गर्दी

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी इथं तोबा गर्दी केली. लालबागचा राजा, अनेकांच्याच श्रद्धास्थानी असणाऱ्या या मंडळाबाहेर हजारो भाविक सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झाली. 

4/7
सुरेल सलामी
सुरेल सलामी

बाप्पाच्या आरतीपासून ते गणपती मंडपाबाहेर येईपर्यंत इथं ब्रास बँड, ढोलताशा पथकांनी सुरेल सलामी देत माहोल तयार केला आणि या भागामध्ये एकच कल्ला पाहायला मिळाला. 

5/7
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया

गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा जल्लोषात अखेर राजा मंडपाबाहेर आला आणि इथलं वातावरण क्षणात बदललं.  

6/7
गणरायाचरणी नतमस्तक
गणरायाचरणी नतमस्तक

बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी इथं सर्वांचीच गर्दी झाली होती. कोणी हात जोडून गणरायाचरणी नतमस्तक होत होतं, तर कोणी मनातील सारंकाही या गणरायापुढे सांगत होतं. कोणी मोबाईलमध्ये हे क्षण कैद करण्याचा प्रयत्न करत होतं. 

7/7
विसर्जन मिरवणूक
विसर्जन मिरवणूक

थोडक्यात काय, तर ही विसर्जन मिरवणूक प्रत्येकजण आपआपल्या परिनं अनुभवत होतं. 





Read More