PHOTOS

...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच

भिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही...

Advertisement
1/17

अभिनेत्री कियारा अडवणाची आज वाढदिवस. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच वाढदिवस असल्याने चाहत्यांमध्येही तिच्या वाढदिवसाबद्दल फार उत्सुकता आहे.

2/17

'सत्य प्रेम की कथा' चित्रपटामधून नुकतीच कियारा चाहत्यांच्या भेटीला आली. या चित्रपटामध्ये तिने एका पीडितेची भूमिका बजावली आहे.

3/17

1992 साली जन्म झालेली कियारा आज 32 वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त नजर टाकूयात तिने नाकारलेल्या चित्रपटांच्या यादीवर...

4/17

अभिनेता वरुण तेजच्या 'घानी' चित्रपटासाठी कियाराला पहिली पसंती होती असं सांगितलं जातं.

5/17

कियाराने ही ऑफर नाकारल्याने सई मांजरेकरने 'घानी' चित्रपटामध्ये कियाराला ऑफर करण्यात आलेली मायाची भूमिका साकारली होती.

6/17

विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेला 'लायगर' चित्रपटही कियाराला ऑफर करण्यात आलेला. मात्र तिने तो ही नाकारला. 

7/17

अनन्या पांड्येने कियाराने नाकारलेली ऑफर स्वीकारल्याने ती 'लायगर'मध्ये विजय देवरकोंडाबरोबर दिसून आली होती.

8/17

कियाराने 'हाऊसफूल-4' हा चित्रपटही नाकारला होता.

9/17

'हाऊसफूल-4' हा मल्टीस्टारर चित्रपट कियाराने नेमका का नाकारला याची माहिती समोर आली नाही.

10/17

कियाराने नाकारलेल्या चित्रपटाच्या यादीमध्ये अभिनेता रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटाचाही समावेश आहे.

11/17

कियाराने नकार दिल्याने 'सिम्बा' चित्रपटामध्ये रणवीर सिंहबरोबर सारा आली खान झळकली होती.

12/17

कियाराने करण जोहरचा 2012 साली प्रदर्शित झालेला 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट नाकारलेला. 

13/17

कियाराने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट स्वीकारला असता तर तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्राला ती फार आधीच भेटली असती. कियारा आणि सिद्धार्थ 'लस्ट स्टोरी'ची शुटींग पूर्ण झाल्यानंतरच्या एका पार्टीमध्ये 2018 साली पहिल्यांदा भेटले होते. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' 2012 ला म्हणजेच कियारा आणि सिद्धार्थ भेटण्याच्या 6 वर्ष आधी प्रदर्शित झाला होता.

14/17

'स्टूडेंट ऑफ द ईयर'मधील मुख्य भूमिका आलिया भट्टने साकारली होती.

15/17

'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटामध्ये कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या.

16/17

कियारा लवकरच 'गेम चेंजर' चित्रपटामध्ये अभिनेता राम चरणबरोबर झळकणार आहे.

17/17

कियारा अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरबरोबर 'वॉर -2' चित्रपटामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.





Read More