PHOTOS

चिंता वाढली; भारतातील जवळपास 86 टक्के नोकरदार वर्गाचा 'या' समस्येशी न संपणारा लढा सुरुच

e report 2024: नोकरीचा या नोकरदार वर्गामध्ये तुमचाही समावेश नाही ना? एका अहवालातून समोर आलीय ही बाब... वाचा नेमकं काय घडलंय.&n...

Advertisement
1/7
सकारात्मक पैलू अनेक असूनही...
सकारात्मक पैलू अनेक असूनही...

Job News : नोकरीचे सकारात्मक पैलू अनेक असले तरीही याच नोकरीची एक नकारात्मक बाजूही अनेकांनीच स्वीकारली असून नाही म्हटलं तरी याच बाजूचा स्वीकार करत एक मोठा नोकरदार वर्ग सध्या न संपणाऱ्या समस्येशी दोन हात करताना दिसत आहे. 

2/7
उत्साही
उत्साही

Gallup Global Workplace report 2024 मधून समोर आलेल्या माहितीनुसार फक्त 14 टक्के भारतीयांना नोकरीच्या ठिकाणी उत्साही वाटतं. तर, उर्वरित वर्ग हा नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करत असून, ही भावना struggling आणि suffering या दोन प्रवर्गांमध्ये गणली गेली आहे. 

3/7
जगभरातील आकडेवारी
जगभरातील आकडेवारी

गॅलपच्या 2024 मधील आकडेवारीनुसार जगभरातील 34 टक्के नोकरदारांना कामाच्या ठिकाणी उत्साही वाटत असतानाच भारतातील आकडेवारी ही अतिशय कमी असल्यामुळं ही चिंतेची बाब ठरत आहे.

 

4/7
मानसिक स्थिती
मानसिक स्थिती

जागतिक स्तरावर नोकरदार वर्गाची मानसिक स्थिती आणि त्यांचं आरोग्य अशा निकषांवर हे निरीक्षण नोंदवण्यात आलं. यामध्ये hriving, struggling आणि suffering अशा निकषांवर नोकरदार वर्गाला विभागण्यात आलं होतं. 

5/7
संघर्ष
संघर्ष

struggling अर्थात नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करणाऱ्या नोकरदार वर्गानं आपल्या वर्तमानाविषयी काही शाश्वती नसल्याची किंवा नकारात्मक दृष्टीकोन असल्याचं सांगत यामध्ये आर्थिक समस्यांनीही त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. 

6/7
नकारात्मक दृष्टीकोन
नकारात्मक दृष्टीकोन

नकारात्मक दृष्टीकोन आणि भविष्याच्या चिंतेव्यरितिक्त काही नोकरदारांना अन्न-वस्त्र- निवारा यासोबतच शारीरिक व्याधी, तणाव, दु:ख, राग अशा समस्या भेडसावतात, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं. 

7/7
न संपणारा संघर्ष
न संपणारा संघर्ष

अहवालानुसार फक्त 14 टक्के वर्ग हा नोकरीच्या ठिकाणी उत्साही असून, 86 टक्के नोकरदार वर्ग हा त्यांच्या त्यांच्या पातळीवर न संपणारा संघर्ष करताना दिसत आहे. फक्त भारतच नव्हे, तर दक्षिण आशियाई देशांमध्ये उत्साही नोकरदारांची संख्या तुलनेनं कमीच असल्याचं सांगत निरीक्षणाचा संदर्भ इथं देण्यात आला.