PHOTOS

पत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन

irector Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं न...

Advertisement
1/15

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या आगामी 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्येच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एटली कुमारच्या शैलीची झलक दिसते.

2/15

तुम्ही यापूर्वी शाहरुखच्या या चित्रपटाशिवाय एटली कुमारचं नाव ऐकलं नसेल. मात्र त्याचा फोटो मात्र तुम्ही नक्कीच पाहिला असेल. कारण एटली आणि त्याच्या पत्नीचे फोटो अनेकदा सोशल नेटवर्किंगवर चुकीच्या अर्थाने व्हायरल होतात. हा वर दिसणारा फोटो तुम्हीही अनेक पेजेसवर पाहिला असेल.

3/15

मागील अनेक वर्षांपासून एटली आणि शाहरुख एकत्र काम करण्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र अखेर 'जवान'च्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. थेट दीपिका आणि शाहरुखच्या चित्रपटाचे दिग्दर्शक करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा एटली कुमार नक्की आहे तरी कोण याचबद्दल जाणून घेऊयात...

4/15

तामीळ फिल्म इंडस्ट्रीमधील नव्या दमाच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये एटली कुमारचा समावेश होतो. सर्वात प्रतिभा संप्पन दिग्दर्शकांपैकी एक म्हणून एटलीकडे पाहिलं जातं. एटलीचा जन्म तामीळनाडूतल्या मदुरईमध्ये झाला. त्याचा वाढदिवस 21 सप्टेंबर रोजी असतो. अटली हा केवळ 37 वर्षांचा आहे. एटलीचं संपूर्ण नाव अरुण कुमार आहे.

5/15

तामीळ चित्रपट सृष्टीमध्ये एटली दिग्दर्शनाबरोबरच स्क्रीनप्ले रायटींगसाठीही ओळखला जातो. तो निर्माता म्हणूनही काम करतो. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'राजा राणी' चित्रपटामधून एटलीनं पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून तामीळ मनोरंजन सृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. 

6/15

‘राजा राणी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने दक्षिण भारतात पहिल्या 4 आठवड्यांत 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. रोमॅन्टीक कॉमेडी जनेरमधील 'राजा राणी’ तुफान यशस्वी ठरला. या चित्रपटात आर्या, जय, नयनतारा, नाझरीया नाझिम, सत्यराजा असे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते.

7/15

‘राजा राणी’च्या यशानंतर एटलीला ‘सर्वोत्तम दिग्दर्शक (पदार्पण)’ पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मानाच्या विजय अवॉर्ड्स सोहळ्यात एटलीला हा सन्मान देण्यात आला. ‘राजा राणी’ चित्रपटाआधी एटली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. त्याने एस शंकर यांच्या एन्थीरान (2010) आणि नानबान (2012) चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

8/15

‘राजा राणी’नंतर एटलीने थारी (2016), मिरसाल (2017) आणि बिगील (2019) या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि स्क्रीन प्ले रायटींग केलं.

9/15

‘राजा राणी’ वगळता एटलीच्या सर्व गाजलेल्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटांचा प्रमुख हिरो हा विजय होता. दिग्दर्शनात यशस्वी ठरल्यानंतर एटलीने ‘ए ऑफ अ‍ॅपल प्रोडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. 

10/15

एटलीने २०१४ साली अभिनेत्री कृष्णा प्रियासोबत लग्न केलं. एटली आणि कृष्ण प्रिया 8 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते असं सांगितलं जातं.

11/15

एटली आणि कृष्ण प्रियाची भेट एका मित्रामुळे झाली. 2006 साली प्रिया एका मालिकेत काम करत होती. याच मालिकेत एटलीचा मित्र देखील काम करायचा. त्यानेच प्रिया आणि एटलीची भेट घालून दिली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

12/15

सौंदर्यवती प्रिया आणि एटलीचे फोटो अनेकदा चुकीच्या कारणाने व्हायरल होतात. खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने दोघांच्या रंगांच्या माध्यमातून वर्णद्वेषी टीका केली जाते. मात्र फोटोत दिसणाऱ्या आणि ज्याला हिणवतोय त्या व्यक्तीच्या म्हणजेच एटलीच्या यशाबद्दल समजल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो.

13/15

2019 मध्ये एका आयपीएल सामन्यादरम्यान एटली कुमार हा कोलकत्ता नाईट रायडर्सचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानच्या बाजूला बसला होता. या दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एटलीला ट्रोलही करण्यात आलं होतं.

14/15

एटली या असल्या टीकांना फारसं महत्त्व देत नाही. तो त्याच्या कामातून बोलतो. हे त्याने मागील एका दशकाहून अधिक काळापासून वारंवार सिद्ध करुन दाखवलं आहे. 

15/15

कृष्णा प्रिया आणि एटलीबद्दल भारतीय चित्रपट चाहत्यांना फारशी माहिती माहिती नसली तरी दक्षिण भारतामध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत.





Read More