PHOTOS

इटलीला पोहोचले G-7 चे मोठे नेते, PM जॉर्जिया मेलोनीमध्ये दिसली भारतीय झलक, काय केलं पाहा

इटलीमध्ये G-7 देशांची बैठक होणार आहे. ही बैठक 13 ते 15 जून दरम्यान होणार असून त्यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर...

Advertisement
1/7
पंतप्रधान विदेश दौऱ्यावर
पंतप्रधान विदेश दौऱ्यावर

तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधानपदाची घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर निघाले आहेत. तिथं ते जी-7 शिखर परिषदेत भाग घेणार आहे.

2/7
जी-7 शिखर परिषद
 जी-7 शिखर परिषद

अशातच आता याच जी-7 शिखर परिषदेसाठी अनेक नेते आणि सात देशांचे प्रमुख इटलीला पोहोचले आहेत. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचा देखील समावेश आहे.

3/7
इटलीत G-7
इटलीत G-7

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो देखील याचं स्वागत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलं.

4/7
उपस्थिती
उपस्थिती

त्याचबरोबर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील उपस्थिती लावली आहे.

 

5/7
मोदी इटलीकडे रवाना
 मोदी इटलीकडे रवाना

अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इटलीकडे रवाना झाले आहेत. अशातच  इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसून आली.

6/7
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पाहुण्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं. त्यावेळी मेलोनी यांनी हात जोडून भारतीय पद्धतीने स्वागत केलं.

7/7
भारतीय परंपरेची छाप
भारतीय परंपरेची छाप

दरम्यान, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात भारतीय परंपरेची छाप दिसून आल्याने सोशल मीडियावर त्यांचं कौतूक होतंय. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतोय.





Read More