PHOTOS

IRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...

ीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टा...

Advertisement
1/7
नवा देश नवा प्रवास
नवा देश नवा प्रवास

Indian Railway : IRCTC आणखी एका नव्या टूरिस्ट पॅकेजसह तुम्हाला भटकंतीवर नेण्यासाठी सज्ज झालं आहे. यावेळी तुम्ही या माध्यमातून अंगकोरवाट, व्हिएतनाम, कंबोडिया इथं फिरू शकता. जिथं, तुम्हाला 3 महत्त्वाच्या शहरांची भ्रमंती करण्याची संधी मिळणार आहे. 

 

2/7
भटकंती
 भटकंती

18 ते 26 एप्रिल 2024 दरम्यानच्या या भटकंतीमध्ये तुम्ही तीन मुख्य शहरं पाहू शकता. दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील सांस्कृतिक वारसा तुम्हाला इथं पाहता येणार आहे. या सहलीवर तुम्हाला प्रवासाचं मुख्य माध्यम असेल हवाई मार्ग. 

3/7
विविध सुविधा
विविध सुविधा

चार स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची सुविधा आयआरसीटीसी तुम्हाला देणार आहे. लखनऊ- व्हिएतनाम- लखनऊ असा प्रवास तुम्ही इथं करणार आहात. 

4/7
कोणकोणत्या ठिकाणांना भेट?
कोणकोणत्या ठिकाणांना भेट?

कंबोडियातील सियाम रीप, व्हिएतनामधील हनोई, दांग जुआन बाजार, व्हिएतनाममधील हा लांग बे, व्हिएतनामधील दा नांग अशा ठिकाणी तुम्हाला या सहलीमध्ये फिरवलं जाणार आहे. 

5/7
माणसी खर्च किती?
माणसी खर्च किती?

तुम्ही तीन व्यक्ती एकत्र या सहलीमध्ये जाणार असाल तर माणसी 147800 रुपये इतका खर्च असेल. दोन व्यक्ती एकत्र प्रवास करणार असाल तर, माणसी 149100 रुपये इतका खर्च येईल. एकट्यानं या सहलीला जाणार असाल तर, माणसी 184200 रुपये इतका खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. 

6/7
खर्चाची सविस्तर माहिती
खर्चाची सविस्तर माहिती

तुम्ही भरत असणाऱ्या रकमेमध्ये विमान प्रवास, परिवहन, 4 स्टार हॉटेल, लक्झरी बस, विमा, जेवण, टूर गाईड या सर्वांचा खर्च समाविष्ट असेल. सहलीला सोबत लहान मुलं असल्यास त्यांच्या खर्चाची सविस्तर माहितीसुद्धा रेल्वेनं दिली आहे. 

7/7
ऑनलाईन बुकिंग
ऑनलाईन बुकिंग

या सहलीसाठी तुम्ही www.irctctourism.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथूनही ऑनलाईन बुकिंग करू शकता. 





Read More