PHOTOS

महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची ...

Advertisement
1/10
महाराष्ट्रातील ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज
महाराष्ट्रातील ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

Marvels of Maharashtra: महाराष्ट्र आपल्या अफाट सौंदर्यामुळे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यापैकी एक औरंगाबाद आहे. जे विशेषतः प्राचीन किल्ले, गुहा आणि ऐतिहासिक इमारतींसाठी ओळखले जाते. आपण महाराष्ट्रात राहुनही राज्यातील बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या नसतात. पण आयआरसीटीसीने आता ही संधी दिली आहे.

2/10
100 हून अधिक लेणी
100 हून अधिक लेणी

औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.

3/10
फिरण्याची उत्तम संधी
फिरण्याची उत्तम संधी

त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे.

4/10
पॅकेज तपशील
पॅकेज तपशील

'मार्वल्स ऑफ महाराष्ट्र X हैदराबाद' असे पॅकेजचे नाव असून 3 रात्री आणि 4 दिवस असा याचा कालावधी असेल. 

5/10
कुठे फिराल?
कुठे फिराल?

औरंगाबाद, एलोरा, नाशिक, शिर्डी हा प्रवास असून फ्लाइटने हा प्रवास करता येणार आहे.

 

6/10
मिळणारी सुविधा
मिळणारी सुविधा

परतीच्या विमानाची तिकिटे उपलब्ध असतील. राहण्यासाठी हॉटेलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

7/10
नाश्ता आणि जेवण
नाश्ता आणि जेवण

3 नाश्ता आणि 2 रात्रीचे जेवण दिले जाईल.  तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.

8/10
प्रवासासाठी इतके शुल्क
प्रवासासाठी इतके शुल्क

या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 25,550 रुपये मोजावे लागतील.

9/10
तीन लोकांना प्रति व्यक्ती शुल्क
तीन लोकांना प्रति व्यक्ती शुल्क

दोन लोकांना प्रति व्यक्ती 21,200 रुपये शुल्क भरावे लागेल. तीन लोकांना प्रति व्यक्ती 20,950 रुपये शुल्क भरावे लागेल.

10/10
IRCTC ची ट्विट करून माहिती
IRCTC ची ट्विट करून माहिती

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे सुंदर नजारे पहायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता, असे लिहिण्याच आले आहे.





Read More