PHOTOS

IPL 2023: आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?

Salary: अशा या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांच...

Advertisement
1/7
IPL 2023 teams
IPL 2023 teams

या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात. 2020 म्हणजेच कोविड काळापासून मात्र या चीअरलीडर्स मैदानात दिसलेल्या नाहीत. यंदाही  त्यांच्या दिसण्याची शक्यता जवळपास नाहीच. 

2/7
IPL 2023 Schedule
IPL 2023 Schedule

हातात रंगीबेरंगी झिरमिळ्या असणारे गोंडे घेऊन नाचणाऱ्या या चीअरलीडर्सही नकळतपणे आयपीएलची ओळख आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुम्हाला माहितीये का त्यांना किती मानधन मिळतं? 

3/7
IPL cheerleaders Salary
IPL cheerleaders  Salary

पंजाब, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादच्या संघाकडून चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी साधारण 150 डॉलर्स मिळतात. 

4/7
IPL cheerleaders
IPL cheerleaders

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय चलनानुसार ही रक्कम प्रत्येक सामन्यासाठी 12300 रुपये इतकी असते. 

5/7
IPL
IPL

राजस्थानच्या संघाकडून चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 180 डॉलर्स म्हणजेच 14800 रुपये मानधन मिळतं. 

6/7
IPL 2023
IPL 2023

बंगळुरू आणि मुंबईच्या संघाकडून चीअरलीडर्ससाठी प्रत्येत सामन्याला 250 डॉलर्स म्हणजेच 20500 रुपये मोजले जातात. 

7/7
IPL 2023 Photos
IPL 2023 Photos

कोलकाता संघाकडून चीअरलीडर्सना सर्वाधिक मानधन दिलं जातं. हा आकडा 300 डॉलर्स म्हणजेच 24700 रुपयांच्या घरात आहे.  

 





Read More