PHOTOS

फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?

िया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही ...

Advertisement
1/7

आलियाचे फिटनेस प्रेम सर्वांना माहिती असून इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ आणि फोटो टाकत असते. राहाच्या जन्मानंतर अवघ्या एक महिन्यात आलियाने योगाला सुरुवात केली. 

2/7

आलिया भट्ट अशा अनेक सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांना योगाच्या माध्यमातून तंदुरुस्त राहणे आवडते . सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांच्याकडून तिने फिटनेसचे धडे घेतले आहेत. 

3/7

सोशल मीडियावर आलियाने एक योगा करताना व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती कपोतासन (Kapotasana) म्हणजेच Pigeon Pose करताना दिसत आहे. 

4/7

सगळ्या पहिले आपल्या पायावर झोपा. त्यानंतर तुमचे गुडघे वाकवून तुमच्या पायाचे तळवे तुमच्या नितंबाजवळ आणा. पाय समांतर असावेत आणि नितंब एकमेकांपासून दूर असावेत. आपल्या हाताचे तळवे आपल्या डोक्याजवळ ठेवा. (Credit - इन्स्टाग्राम)

5/7

हाताची बोटे पायाच्या बोटांसारखीच ठेवा. श्वास घ्या आणि आपले खांदे, नितंब जमिनीवरून उचला. आपले डोके वर ठेवा आणि मानेवर जास्त भार टाकू नका. शरीर वर उचलून गोलाकार पोझिशनमध्ये या. 

6/7

कपोतासन योगामुळे हात, पाय आणि पाठीचा कणा मजबूत होतो. त्याशिवाय छातीचे स्नायू उघडतात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात.

7/7

हिप फ्लेक्सर आणि कोर मसल्स स्ट्रेच मिळतात आणि हृदयाचे मसल्स स्ट्रेच होण्यास मदत मिळते. यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगले राहण्यास फायदा होतो. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  





Read More