PHOTOS

'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?

: अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये...

Advertisement
1/9
रानी की वाव
रानी की वाव

मारु गुजारा प्रकाराती स्थापत्यशैलीच्या आधारे गुजरातमधील पाटन येथे ही वास्तू सरस्वती नदीच्या काठावर उभारण्यात आली. या वास्तूच्या निर्मितीमागे राणी उदयमती यांचं योगदान मोलाचं मानलं जातं. ही वास्तू त्यांनी पती, सोलंकी साम्राज्याचे राजे भीमा पहिले यांच्या स्मरणार्थ बांधली होती. 

 

 

2/9
मोहिनिश्वरा शिवालय
मोहिनिश्वरा शिवालय

काश्मीरच्या गुलमर्ग येथे एका लहानशा टेकडीवर हे मंदिर 1915 मध्ये उभारण्यात आलं. तत्कालीन काश्मीरचे राजे हरी सिंह यांच्या पत्नी महाराणी मोहिनीबाई सिसोदीया यांनी हे मंदिर उभारलं होतं. 

 

 

3/9
मिरजां किल्ला
मिरजां किल्ला

इतिहासातील अनेक युद्धांची साक्ष देणारा हा किल्ला आहे, कर्नाटकातील मिरजां किल्ला. गेरसोप्पाच्या महाराणी चेन्नाभैरवी यांनी हा किल्ला उभारल्याचं सांगितलं जातं. 

 

4/9
माहिम कॉजवे
माहिम कॉजवे

मुंबईत 1841-1846 दरम्यान, शहरातील दोन बेटं जोडण्यासाठी माहिम कॉजवेची निर्मिती करण्यात आली होती. जमशेदजी जीजीबॉय यांच्या पत्नी लेडी अवाबाई जमशेदजी जीजीबॉय यांनी या प्रकल्पासाठी त्या काळात 1,57,000 रुपये इतकी मोठी रक्कम दिली होती. 

 

5/9
लाल दरवाजा मशीद
लाल दरवाजा मशीद

1447 मध्ये सुलतान मोहम्मद शारकी यांच्या बेगम राजे बिबी यांनी या मशिदीची उभारणी केली होती. तत्कालीन संत सय्यद अली दाऊद कुतूबुद्दीन यांना ही वास्तू समर्पित होती. 

 

6/9
हुमाहूनचा मकबरा
हुमाहूनचा मकबरा

मुघल शासक हुमायून यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी, हमीचा बानू बेगम यांनी 1569 मध्ये हा मकबरा उभारला. एका फारसी स्थापत्य कलाकारानं या मकबऱ्याची आखणी केली होती. 

 





Read More